Breaking News

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात भाजपाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे चित्र देशाच्या राजकारणात पाह्यला मिळू लागले. त्यातच गुजरातमधील सूरत येथे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरवित भाजपा उमेदवाराला बिनविरोध घोषित केले. अगदी त्याच पध्दतीने मध्य प्रदेशातील काँग्रेस उमेदवाराने लोकसभा निवडणूकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेत अचानकपणे भाजपात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती आज दुपारी उघडकीस आली.

मध्य प्रदेशातील इंदौर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अक्षय कांति बम यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख होती. यापार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कैलाश विजयवर्गीय यांनी काँग्रेस उमेदवार अक्षय बम यांना दुपारी १२ वाजण्याच्या आधीच उमेदवारी अर्ज माघार घेण्यास लावले. त्यानंतर अक्षय बम यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला.

विशेष म्हणजे भाजपाकडून ऑपरेशन सूरत-२ असे या घटनेला नाव देण्यात आले होते. सूरतच्या धर्तीवरच मध्य प्रदेशातील इंदौर येथील लोकसभा निवडणूकही बिनविरोध करण्याचा इरादा भाजपाकडून आखल्याचे या निमित्ताने उघडकीस आले आहे. तसेच अशा पध्दतीने आणखी किती राज्यात भाजपाकडून बिनविरोध उमेदवार निवडूण आणण्यासाठी अशा गोष्टी करण्याची योजना आखले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान अक्षय कांति बम यांच्यावर २५ वर्षे जून्या ३०७ अन्वये खाली एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यावरून भाजपाने अक्षय कांति बम यांच्यावर दबाव आणून उमेदवारी अर्ज माघारी घायला लावल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *