Breaking News

एचडी कुमारस्वामी यांची माहिती, जनता दलातून प्रज्वल रेवन्ना याची हकालपट्टी

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याची जनता दलाचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी आज काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.  प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहेत, उद्या (३० एप्रिल) सकाळी १० वाजता कर्नाटकातील हुबली येथे होणाऱ्या JD(S) कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णयावर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

प्रज्वल रेवन्ना हे कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघातील भाजपा-जेडी(एस) युतीचे उमेदवार आहेत. प्रज्वल रेवन्ना यांच्या हसन लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले आहे.

अलीकडच्या काही दिवसांत, प्रज्वल रेवन्ना यांनी शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे चित्रण करणारे अनेक कथित व्हिडिओ समोर आले आहेत आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत. कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या दोन दिवस आधी हे स्पष्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जेडी(एस) खासदार हसन लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच प्रज्वल रेवन्ना यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः प्रचारसभा घेतली होती.

३३ वर्षीय प्रज्वल रेवन्ना हा एचडी रेवन्ना यांचा मुलगा आहे, जे आमदार आणि माजी मंत्री आहेत, तसेच माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा, यांचे नातू आहेत. दरम्यान, कर्नाटक जेडी(एस) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले की, त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून त्यांचा पुतण्या प्रज्वल रेवन्ना याचा बचाव करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि विशेष तपास पथकाच्या तपासात हे सिद्ध झाल्यास पक्ष “कडक कारवाई” करेल.

यापूर्वीच कर्नाटकातील काँग्रेस सरकारने प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात “एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, तपासात (गुन्हा) सिद्ध झाल्यास, जो कोणी असेल त्याला शिक्षा भोगावी लागेल. ज्याने चूक केली असेल त्याला देशाच्या कायद्यानुसार कारवाईला सामोरे घ्यावे लागेल आम्ही पक्षाकडून कडक कारवाई करू. त्याचा बचाव करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने खासदाराने शेकडो महिलांच्या कथित लैंगिक शोषणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *