Breaking News

अॅड असीम सरोदे यांचा आरोप, न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतरही एक हजार कोटींच्या रोख्यांची छफाई

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने केलेला निवडणूक रोखे घोटाळा जनतेसमोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे अवैध ठरवत भाजपा सरकारला चांगलेच फटकारले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २४ रोजी निवडणूक रोखे घटनाबाह्य व बेकायदा ठरवल्या नंतरही नाशिक सिक्युरिटी प्रेसने १ हजार कोटी रुपयांचे निवडणूक रोखे छापल्याचा गंभीर आरोप निर्भय बनो अभियानाचे प्रवर्तक, कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

यावेळी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, सीए प्रसाद झावरे, शहर काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष सुभाष थोरवे, धनंजय भिलारे, ॲड बाळकृष्ण निढाळकर, ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे इ उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड. असीम सरोदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोखे वरील सुनावणी अंतिम टप्यात असतांना सुध्दा सिक्युरिटी प्रेसने १० हजार कोटी रुपयांचे इलेक्ट्रॅाल बॉन्ड छापले. प्रकरण न्यायाप्रविष्ट असताना ते छापणे चुकीचेच होते, मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे घटनाबाह्य असल्याचे जाहीर केल्यावरही १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत नाशिक सिक्युरिटी प्रेसने १ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे छापल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे इलेक्ट्रॅाल बाँड नेमके कोणी घेतले व कोणत्या पक्षास दिले याची माहिती नाशिकच्या सिक्युरीटी प्रेस ने दिलेली नाही..!

या संदर्भात बाजारात आणलेले ईले बाँड सिक्यु प्रेसने परत घ्यावेत, अशी नोटीस नाशिक सिक्युरिटी प्रेसला दिल्याचे ॲड असीम सरोदे यांनी या वेळी सांगितले.

इलेक्ट्रोरल बाँड प्रकरणी दुसरा घोटाळा पुढे आणतांना ॲड सरोदे यांनी सांगितले की, निकालानंतर छापलेल्या बॉन्ड ची जीएसटी भरल्याचेही समोर आले आहे. मात्र ते बॉन्ड नेमके कुणी घेतले, कोणत्या पक्षाला दिले यांची माहिती सिक्युरिटी प्रेसने दिली नसल्याचे स्पष्ट केले.

पुढे बोलताना अॅड असीम सरोदे म्हणाले की, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये त्यांचा कार्यकाल संपत आलेला असताना बेकायशीररित्या अजय आंबेकर, हेमराज बागुल, किशोर गांगुर्डे, वर्षा आंधळे, अजय जाधव अशा ‘माहिती संचालनालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना ‘कृषी तंत्रज्ञान व सरकारी योजनांची माहिती प्रभावीपणे प्रसारीत करण्याचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी पाठविण्यात आल्याते सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात ‘वेब मिडीयाचा आधुनिक वापर,सायबर क्राईम व सायबर सुरक्षा इ बाबतीत सरकार साठी डीजीटल मार्केटींग अशा विषयांचा या मध्ये समावेश होता आणि महत्वाचे म्हणजे केवळ ईस्र्रायल सरकारच्या विभागा सोबतच नाही तर ईतर अनेक खाजगी मिडीया हाऊसेस, इलेक्ट्रॅानिक संदेश वहन क्षेत्रातील निर्मात्यां सोबत ही विविध चर्चा आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रकरणा बाबत विविध शंका व्यक्त करणारी जनहित याचिका लक्ष्मण एन बुरा नावाच्या व्यक्तिने दाखल केली होती. परंतु काही कायदेशीर क्लुप्त्या करून ती जनहित याचिका प्रलंबित ठेवण्यात आल्याचे आढळल्यावर रायगड जिल्ह्यातील प्रितम साळवी यांनी आज २९ एप्रिल २०२४ रोजी एक हस्तक्षेप याचिका वकील असीम सरोदे व विनय खातू यांच्या द्वारे मुंबई ऊच्च न्यायालयात दाखल करून इस्त्रायल दौरा प्रकरण तातडीने चालवायची मागणी केली.
तसेच पुढे बोलताना अॅड असीम सरोदे म्हणाले की, २०१९ मघ्ये सत्तांतर झाले व अनिल देशमुख गृहमंत्री असतांना त्यांनी या प्रकरणातील बाबींची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी अतिरीक्त मुख्य सचिव व सीआयडीचे सह आयुक्त यांचे कडे सोपवली. सत्ता स्थापनेच्या काळात शिवसेना, राकाँ व काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांचे फोन टॅपिंग झाले होते. व तसा आरोप देखील भाजपा नेत्यांवर झाला होता. या फोन टॅपिंगचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी राज्यातील कोणते अधिकारी इस्रायलला गेले व त्यांनी तेथून कोणते सॅाफ्टवेअर आणले याची चौकशी होणार असल्याचे तत्कालीन मविआ सरकारने जाहीर केले होते आणि त्यानंतरच अनिल देशमुखांवर कथित १०० कोटीच्या वसुलीचे आदेश भाजपाने लावले होते हा घटनाक्रम जसा महत्वाचा आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचेवर अप्रत्यक्ष आरोप करणारी उच्च न्यायालयाची जनहित याचिका महत्वाची आहे. माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करून निवडणुका कश्या जिंकायच्या हे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी हे अधिकारी गेल्याचे इस्त्रायल’ने दिल्याचे माहितीवरून उघडकीस आले आहे, या सत्तेच्या गैरवापराला फडणवीस यांनी अभ्यास दौरा असे गोंडस नाव दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांची माहिती तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना मिळाली, या प्रकरणाची त्यांनी चौकशी सुरू केल्यानेच देशमुख यांच्यावर १०० कोटीच्या वसुलीचे आरोप भाजपाने केले का, पेगॅसीस प्रकरणाशी या घटनाक्रमाचा संबंध आहे का असे महत्वाचे प्रश्न पुढे येतात असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना अॅड असीम सरोदे म्हणाले की, सोशल मीडिया, प्रसार माध्यमे, माहिती तंत्रज्ञान यांचा नरेंद्र मोदी, अमित शाह व देवेंद्र फडणवीस गैरवापर करतात असे आरोप त्यांच्यावर सातत्याने झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा राजकीय हेतूने संघटित गुन्हेगारी वापर करण्याच्या प्रकारांची चौकशी होऊन नागरिकांच्या शंकांचे निरसन झाले पाहिजे अशी मागणी यावेळी केली.

दरम्यान, राज्यात महायुतीला फक्त १० जागा

सोशल मीडिया आणि काही प्रसार माध्यमांना हाताशी धरून राज्यात महायुतीला पोशाक वातावरण असल्याचे भासविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यात आज वस्तुस्थिती अशी आहे की भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्यावर मोदी, शहा, फडणवीस काहीच बोलत नाहीत, केवळ भावनेच्या मुद्द्यांना हात घालत आहेत, आज मतदार सुजाण आहे, जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाला तो बळी पडणार नाही, आम्ही राज्यात ६० हून अधिक ‘निर्भय बनो’ सभा घेतल्या यातून असे दिसते की राज्यात महायुतीला फक्त १० जागा मिळतील असा दावाही अॅड असीम सरोदे यांनी केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, पंतप्रधान मोदींच्या तोंडी उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्राचीच…

काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *