Breaking News

Tag Archives: devendra fadnavis

प. बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका ! मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षातील काही मंडळी मराठा समाजाला चिथावणी देत असल्याची माहिती समोर येते आहे. राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आणणारा पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे …

Read More »

देवेंद्र फडणवीस हे आरक्षणच्या विरोधात; तर भाजपा दोन्ही बाजूने खेळतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षण कायद्याच्या विरोधात व मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी दोन्ही बाजुने खेळतेय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारची संयुक्त …

Read More »

महाविकास आघाडीसरकारवर भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील आणि फडणवीसांची टीका महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आरक्षण रद्द

पुणे-नागपूर: प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश आले असून आघाडी सरकारमुळे मराठा समाजाने शिक्षण व नोकरीतील आरक्षण गमावले आहे. यामुळे मराठा तरूण तरुणींच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असून मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, अशी …

Read More »

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राज्यांना नाहीत सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अयोग्य ठरवित एखाद्या जातीला आणि जमातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे ठरविण्याचे अधिकार १०२ व्या घटनादुरूस्तीनुसार राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने ३:२ या मताने निर्णय दिला. त्यामुळे राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण आता संपुष्टात आले. …

Read More »

आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणाही नको! आरटीपीसीआर चाचण्याचे प्रमाण वाढवा-देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: प्रतिनिधी कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दिला. गेल्यावर्षी …

Read More »

ब्रेक दि चेन निर्बंधातंर्गत नवे नियम लागू झाले पण प्रवास, रेल्वेने जायचाय: तर हे वाचा राज्य सरकारने केले लोकांच्या शंकाचे निरसन

प्रश्न १ – डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांचे शिवाय प्रवास करू शकतात का? उत्तर – होय. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये व्यक्तिगत/ खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करून त्यांना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या ओळख पत्राच्या आधारे प्रवास करू शकतात. त्यांच्या प्रवाशाचे निमित्त वैद्यकीय आणि आरोग्यशी संबंधित असणे अपेक्षित …

Read More »

देवेंद्रजी, साठेबाजासाठी दाखवलेली तत्परता लोकांचे जीव वाचवण्यासाठी दाखवा कोरोना संकटात भाजपाच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांचे वर्तन बेजबाबदारपणाचे-नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. परंतु या कठीण प्रसंगात भारतीय जनता पक्ष जबाबदारीने वागण्याऐवजी राज्य सरकारला अडचणीत कसे आणता येईल यातच वेळ घालवत आहे. केंद्र सरकारकडून या संकटात राज्याला भरीव मदत मिळणे आवश्यक आहे, त्यासाठी राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारसोबत एकत्र येऊन केंद्राकडून जास्तीत जास्त मदत आणण्यासाठी …

Read More »

भाजपावाल्यांनाच रेमडेसीवीर कसे मिळते? आगामी काळात भाजपच्या कारनाम्यांचा भांडाफोड करणार असल्याचे नवाब मलिक यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यासह देशात कोरोनाबाधित रूग्णांसाठी रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा जाणवत असताना गुजरातमध्ये भाजपा कार्यालयात आणि जळगांवातील भाजपाच्या माजी आमदाराकडून रेमडेसिवीर औषधांचे मोफत वाटप, त्याचा काळाबाजार आणि साठेबाजी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना ब्रुक फार्मा कंपनीकडूनही रेमडेसिवीरचा साठा उलब्ध होणार असल्याचे सांगितले. रूग्णांसाठी रेमडेसीवीर औषधे उपलब्ध …

Read More »

राज्याच्या गृहमंत्र्यांचा फडणवीस आणि भाजपाला इशारा पोलिसांवरील दबाव सहन करणार नाही- मंत्री वळसे-पाटील

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सध्या रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा असताना या औषधांचा मोठा साठा मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील …

Read More »

केंद्राने साठेबाजी, काळाबाजार करण्याची फडणवीस व भाजपाला परवानगी दिलीय का? पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्याला सोडवले आणि तो साठा भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीने मिळवल्याचा दावा केला. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर …

Read More »