Breaking News

खासदाराचे नेमके काम काय? जीव धोक्यात आल्याने मतदाराने लिहिले खासदारांना पत्र राहुल शेवाळे यांना पत्र पाठवित करून दिली जबाबदारीची जाणीव

देशाच्या धोरणाला दिशा मिळावी म्हणून निवडून दिलेले खासदार निवडल्यानंतर जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करतात परंतु आता निवडणूक जवळ आल्याने प्रसिद्धीसाठी गटारावर अनधिकृतरित्या उभ्या राहिलेल्या मंदिराची उभारणी करताहेत, हे बेकायदेशीर काम केल्याने जीव धोक्यात आलेल्या नागरिकांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांना अनावृत्त पत्र लिहिले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे…

प्रती,
आदरणीय राहुल शेवाळे,
खासदार, दक्षिण मुंबई मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
मुंबई

विषय: एक नागरिक म्हणून खासदार राहुल शेवाळे यांनी माझा जीव धोक्यात आणल्याबद्दल आपल्या लक्षात आणून देण्याबाबत..

महोदय,
आपण दक्षिण मध्य मुंबई( अनुसूचित जाती राखीव) या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेला आहात. खासदार म्हणून लोकप्रतिनिधीचे काय कर्तव्य असतात हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. लोकसभेमध्ये कायदे मंजूर करणं. केंद्र पातळीवर धोरण ठरवणे आणि धोरणांचा पाठपुरावा करणे खासदार निधीचा विनियोग लोकसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करणे.
ही खासदाराची घटनात्मक कामे आहेत हे मला ठाऊक आहे. स्थानिक पातळीवरील रस्ता पाणी हे प्रश्न लोकसभा आणि राज्यसभा खासदाराच्या अकत्यारीत येत नाही कारण त्यासाठी स्थानिक प्रशासन जसे की मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे.
महोदय, मी आपल्या मतदारसंघातील प्रतिक्षा नगर भागात राहणारा एक सर्वसामान्य नागरिक आहे. परवा अचानकपणे मी राहत असलेल्या इमारतीच्या बाहेर आपलं नाव सांगून काही कार्यकर्त्यांनी मंदिराच्या सुशोभीकरणाला सुरुवात केली. वास्तविक पाहता हे मंदिर गटारावर उभे असून हा फुटपाथ चा भाग आहे. मुंबई महानगरपालिकेच्या भाषेत याला अनधिकृत म्हणतात याा मंदिराच्या विस्तारीकरणाचे काम आपल्या खासदार निधीतून होत असल्याचं संबंधितांनी मला सांगितले त्यामुळे मी केंद्र सरकारच्या MPLD पोर्टल वर जाऊन या कामाचा शोध घेतला. परंतु असे कुठलेही काम प्रस्थापित किंवा मंजूर असल्याचे मला दिसले नाही.
बरे ,असो आपणाला निवडून दिल्यापासून अनेक वर्ष आपले दर्शन झालेले नाही. मध्यंतरीचा काळ हा कोविड महामारीचा होता. या भागातील आमदार आणि नगरसेवकांनी अपेक्षा नुसार त्यांना जेवढी शक्य आहे तेवढी मदत केल्याचे मला दिसले.
असो अनेकदा लोकसभेचे कामकाज पाहत असताना मला मी राहत असलेल्या लोकसभा मतदारसंघातील कामांची आठवण होते त्याबाबत आपण उपस्थित केलेला प्रश्नांची ही मी माहिती करून घेतली आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदान संघातील प्रश्न सोडून एकदा तर जुन्नर तालुक्यातील प्राचीन बौद्ध लेणीला मंदिराचा दर्जा देण्याची आपण लोकसभेत मागणी केल्याचे मला आठवते. अर्थात हा प्रश्न तुमचे खासदार मित्र डॉ. अमोल कोल्हे यांचा असेल असे मला वाटते. असो मी शेतकरी कुटुंबातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मला सहानुभूती वाटते. जगभर दखल घेतलेले शेतकरी आंदोलन सुरू असताना लोकसभेत अनेकदा चर्चा झाली त्यावर आपली काय भूमिका होती?
तुम्ही शेतकरी पुत्र असल्याचं एका कार्यक्रमात सांगितल्याचं मला आठवतं तुमचं ते शेतकरी प्रेम त्यावेळेस का उफाळून आलं नाही?
अयोध्येतील राम मंदिरासाठी तुम्ही आग्रही असणं साहजिक आहे.एका वेळेस जुन्नरच्या बौद्ध लेणीच्या मंदिराची मागणी ही तुमची तुमच्या अधिकाराचा भाग असेल. परंतु आम्ही राहत असलेल्या प्रतीक्षा नगर मधील गटारावर उभे असलेल्या फुटपाथ वरील साई मंदिराबद्दल आपले अचानक प्रेम कसे काय उफाळून आले हे मला समजत नाही.
तुम्ही अनेकदा तुमच्या भाषणामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तीने हा देश राज्यघटनेच्या माध्यमातून उभा करून आपल्या शीलवृत्तीने आदर्श निर्माण केला आहे हे तुम्हाला ठाऊकच आहे.
मध्यंतरी प्रसार माध्यमातून आपले दुबईतील एका महिलेसोबत फोटो प्रसिद्ध झाले होते. याबाबत पोलिस ठाण्यामध्ये तक्रारी देखील दाखल असल्याचे समजते. आपणच या महिलेचे संबंध दाऊदची असल्याचा आरोप केल्याचेही आठवते. मला प्रतिनिधित्व करत असलेल्या लोकसभा सदस्यांची अशी बदनामी मला योग्य वाटत नाही. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याकडून याच्यात बाबत आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी स्पष्टीकरण यावे जेणेकरून माझ्यासारख्या मतदाराच्या मनामधील संभ्रम दूर होईल.
असो माझ्यासारख्या मतदाराने तुम्हाला शिवसेना म्हणून मतदान केलं होतं. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रामराम करून आपण शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याचं प्रसारमाध्यमातूनच मला समजलं. वास्तविक आमच्यासारख्या मतदाराने आपणाला आणि पक्षाला मतं दिलं होतं. शिंदे गटात जाण्याचा निर्णय तुम्ही स्वतःहून घेतला की मतदारांना विचारून घेतला हे देखील मला तुम्हाला विचारणं योग्य वाटतं.
तुमच्या खासदारकीच्या कामाचा लेखाजोखा केंद्र सरकारच्या MPLD पोर्टलवर उपलब्ध आहे.
तूर्ताच एवढेच आपल्या पुढाकाराने होत असलेल्या सोसायटीच्या गेटवरील अनधिकृत मंदिराचे विस्तारणी करण्याचे त काम थांबवावे आणि ते अतिक्रमण आणि अनधिकृत काम तातडीने थांबवावे. तुमच्या या धार्मिक कामामुळे उद्या माझ्या सोसायटीमध्ये आग लागली तर त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकणार नाही. हा माझ्या जीवाला धोका आहे आपण सुजाण आहात आणि जबाबदार लोकप्रतिनिधी आहात त्यामुळे योग्य कायदेशीर कारवाई करावी अशी माफक अपेक्षा आहे.
आपला नम्र,
एक मतदार, ( दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ)
या प्रकरणात नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनाही पत्रव्यवहार केला असून अनधिकृत बांधकामाच्या विरोधात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत असून देण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवक रामदास कांबळे यांनी याबाबत कोणतेही मत व्यक्त करण्यास नकार दिला हे काम आमच्या हत्यारित येत नाही असं सांगत त्यांनी या प्रश्नावरील उत्तर टाळले.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *