Breaking News

Tag Archives: Shivsena (Shinde Faction)

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेवर मंत्री उदय सामंत यांचे आवाहन मराठा आरक्षण बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जरांगेनी जाब विचारावा

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा उपोषणाचे आंदोलन मागे घेत इथे सलाईन लावून मरण्यापेक्षा आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढून मरू असे सांगत मला तुरुंगात टाकण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांचा आहे. जर उद्या मला सरकारने तुरुंगात डांबले तर भाजपाची एकही सीट निवडून देऊ नका …

Read More »

संजय निरूपम यांचा सवाल,… उद्धवजी अदानींकडून निधी घेतला की नाही? निवडणुकीकरिता देणग्या मिळवण्यासाठी उबाठा गटाची उठाठेव

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उबाठाची उठाठेव सुरु आहे. धारावी पुनर्वसनला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते माजी खासदार संजय निरुपम यांनी करत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावे की त्यांनी अदानींकडून निधी घेतला की नाही? असा परखड सवाल निरुपम …

Read More »

Hit And Run worli: मिहिर शहाला पोलिस कोठडी, तर राजेश शहाची उपनेतेपदावरून हकालपट्टी शिवसेना शिंदे गटाचा निर्णयः मिहिर ६० तासानंतर पोलिसांच्या ताब्यात

भल्या पहाटे आपल्या रोजगाराच्या निमित्ताने मुंबईतील वरळीतील आपल्या घराकडे विक्रीसाठी बाहेर पडलेल्या नाकाव कुटुंबियांच्या दुचाकीला शिवसेना शिंदे गटाच्या उपनेते राहिलेल्या राजेश शहा याच्या मुलाने मिहिर शहाने धडक दिली. तसेच अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशी अर्थात काल संध्याकाळी अखेर मिहिर शहाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आज दुपारी शिंदे गटाचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेटः भेटीत या मुद्यांवर झाली चर्चा नागपूरच्या दिक्षाभूमीसह अनेक प्रश्नांवर झाली चर्चा

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दीक्षाभूमी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. गायरानावरील घरांवर कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली. त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन …

Read More »

निकालावरील वादावर रविंद्र वायकर यांचे भाष्य, त्यांना काय करायचे ते करू दे पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्याकडून आरोप-प्रत्यारोप

लोकसभा निवडणूकीत अवघ्या ४८ मतांनी विजयी ठरलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. त्यातच ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी निवडणूक निकालावरून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी वायकर याचे मेहुण्याने मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेल्याच्या आरोपावरून त्यांच्यासह सात – आठ …

Read More »

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान होत आहे. तत्पूर्वी चवथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असतानाच संभाजी नगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्ये आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये समोरासमोर येत परस्पर विरोधी घोषण देऊ लागले. मात्र उशीराने का होईना पोलिसांनी हस्तक्षेप करत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप नामांतराविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे

छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव शहरांच्या नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे. नामकरणाविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे आहेत. या निर्णयामुळे दोन्ही शहरांच्या नावाला विरोध करणाऱ्यांना चपराक बसली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजी नगर दौऱ्यावर …

Read More »

नरेश मस्के यांच्या उमेदवारीच्या विरोधात भाजपाच्या ६४ नगरसेवकांचे राजीनामे

लोकसभा निवडणूकीसाठी पुरेसे उमेदवार शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडे नसल्याने शिवसेना शिंदे गटाकडून एकतर विद्यमान आमदारांना लोकसभेची उमेदवारी दिली. तर काही नवे चेहरेही लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने दिले. मात्र ठाणे मधून एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी नरेश मस्के यांना शिवसेना शिंदे गटाने दिलेली उमेदवारी नवी मुंबईतील भाजपाचे गणेश नाईक यांच्या समर्थकांना …

Read More »

‘महायुती’ च्या पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांचा शरद पवारांवर आरोप

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे-नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

भावना गवळी यांची नाराजी दूर, प्रचारात उतरणार

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यावर सध्या ईडीची टांगती तलवार असून १८ व्या लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्याचे भाजपा आणि शिवसेना पक्षाने टाळले. या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर, विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत आणि यांच्यासह अनेक …

Read More »