Breaking News

नरेश मस्के यांच्या उमेदवारीच्या विरोधात भाजपाच्या ६४ नगरसेवकांचे राजीनामे

लोकसभा निवडणूकीसाठी पुरेसे उमेदवार शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडे नसल्याने शिवसेना शिंदे गटाकडून एकतर विद्यमान आमदारांना लोकसभेची उमेदवारी दिली. तर काही नवे चेहरेही लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने दिले. मात्र ठाणे मधून एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी नरेश मस्के यांना शिवसेना शिंदे गटाने दिलेली उमेदवारी नवी मुंबईतील भाजपाचे गणेश नाईक यांच्या समर्थकांना आवडलेली दिसत नाही. त्यामुळे गणेश नाईक यांनी उमेदवारीसाठी डॉ संजीव नाईक यांच्या नावाचा विचार करावा अशी मागणी करत ६४ नगरसेवकांसह भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त हाती आले आहे.

ठाणे शहर जिल्ह्याच्या काही भागात ज्या पध्दतीने एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्याप्रमाणे नवी मुंबई महापालिका आणि परिसरात गणेश नाईक यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच नवी मुंबई विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक यांचे राजकिय प्राबल्यही आहे. यापूर्वी डॉ संजीव नाईक यांना यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून लोकसभेची उमेदवारी देत ते निवडूणही आले होते. त्यानंतर त्यांच्या मुलाला मिळालेली भाजपाची उमेदवारी गणेश नाईक यांना देत विधानसभेवर निवडूणही दिले. मात्र ठाणे मधून शिवसेना उबाठा गटाचे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात नरेश मस्के यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने नरेश मस्के यांच्याऐवजी डॉ संजिव नाईक यांच्या नावाचा विचार का झाला नाही यावरून गणेश नाईक यांच्या सर्व समर्थक नगरसेवक आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत मुंबईच्या दिशेने निघाल असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच लोकसभा निवडणूकीत नवी मुंबई मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या नरेश मस्के यांचे काम कोणी करणार नाही असा पवित्राही गणेश नाईक यांच्या समर्थकांनी घेतला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपाच्या गणेश नाईक यांच्यात राजकिय वरचढपणाची लढाई सुरु झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आमदार गणेश नाईक यांच्यासोबत भाजपाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली क्रिस्टल हाऊस येथे भाजपा नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे उमेदवार नरेश महस्के हे क्रिस्टल हाऊस येथे पोहोचले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार रवींद्र फाटक व आमदार प्रताप सरनाईक , भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले हे उपस्थित होते.
मात्र एकीकडे त्यांची नाईक यांच्याशी चर्चा सुरू होती, तिथेच दुसरीकडे मात्र पदाधिकाऱ्यांचा आक्रोश व रोष होता यावातावरण क्रिस्टल हाऊस येथे पहावयास मिळत होता. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट न घेता उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासह आमदार रविन्द्र फाटक , प्रताप सरनाईक यांना क्रिस्टल हाऊसच्या मागच्या दाराने ठाण्याकडे जाण्यासाठी बाहेर पडावे लागले.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *