Breaking News

चित्रा वाघ यांचा आरोप, पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी अश्लील संस्कृती रुजविण्याचा उद्धव ठाकरेंचा उद्योग

छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी नवी अश्लील संस्कृती रुजवायचा किळसवाणा उद्योग करत आहेत असा प्रहार भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल पेंडसे यावेळी उपस्थित होते.

चित्रा वाघ यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी उबाठा शिवसेने तर्फे बनवलेल्या जाहिरातीमधून एक पॉर्न स्टारच जनतेला महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असा सवाल विचारत आहे. आपल्या प्रचारासाठी उबाठा शिवसेनेची जाहिरात पाहून स्त्री, पत्नी, आई आणि मुलगी म्हणून माझी मान शरमेनं खाली झुकली गेली. उबाठा च्या निवडणूक प्रचाराची जाहिरात बनवणारी कंपनी, ठाकरे परिवार तसेच जाहिरातीमध्ये पित्याची भूमिका वठवणारा पॉर्न स्टार आणि उबाठा शिवसेना यांचा संबंध काय आहे याचे उत्तर ठाकरे यांनी महाराष्ट्राला द्यावे. या जाहिरातीबद्दल उबाठा शिवसेनेने आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी असे आव्हानही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिले.

चित्रा वाघ म्हणाल्या की निवडणुकीच्या काळात आणि त्याआधी पासून उबाठा गटाचे नेते महिलांचा वारंवार अपमान करत आहेत. अमरावती येथील महायुतीच्या महिला उमेदवाराबाबत उबाठा नेत्यांनी कोणती भाषा वापरली हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यापुढे जाऊन उबाठा शिवसेनेच्या निवडणूक प्रचाराच्या जाहिरातीत उल्लू ॲप या अश्लील ॲप वरून लहान मुलींबरोबर अश्लील चित्रीकरण करणाऱ्या पॉर्नस्टार च्या माध्यमातून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे. जाहिरातीत पित्याची भूमिका करणारा पॉंर्नस्टार महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असा प्रश्न विचारतो यासारखी महिलांची क्रूर चेष्टा कोणी केली नसेल. उद्धव ठाकरेंची वैचारिक पातळी इतकी घसरली का असा संतप्त सवाल ही केला.
केंद्रातील मोदी सरकारने आधीच अनेक अश्लील ॲप्स वर बंदी घातली असून उल्लू ॲप वर ही बंदी घालावी अशी मागणी केली.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *