Breaking News

Tag Archives: shivsena (UBT)

आशिष शेलार यांची टीका,… ही यादी म्हणजे उबाठाच्या पराभवाची पहिली पायरी

एक खिचडीतील भ्रष्टाचारी, एक जुना राष्ट्रवादी यांनी घेतला कडेवरी आणि एक बांडगूळा सारखा आमच्या मतांचा त्यावेळचे वाटेकरी …. उबाठाची आजची यादी म्हणजे पराभवाची पहिली पायरी अशी खोचक टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, उबाठा गटाची आज यादी जाहीर झाली त्यामध्ये …

Read More »

शिवसेना उबाठा गटाने यादी जाहिर करताच काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

जवळपास मागील एक महिन्यापासून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा गटात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा सुरु होती. या चर्चेत काही काळ प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीही सहभागी झाली. मात्र वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा मिळाल्या नसल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडणे …

Read More »

शिवसेना उबाठा गटाने जाहिर केली १६ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी

लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीयस्तरावरील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात काँग्रेस पक्षाने आणि भाजपाने आघाडी घेतली आहे. काँग्रेसने मात्र प्रत्येक राज्यातील स्थानिक प्रादेशिक पक्षांनाचा प्राधान्यक्रम देत स्वतःच्या हिशाच्या जागा जाहिर केल्या. याच कृत्याची पुनरावृत्ती भाजपाने करत त्यांच्या पक्षाच्या हिश्याला येणाऱ्या जागांचे वाटप जाहिर केले. मात्र या दोन्ही काँग्रेस आणि भाजपाने स्थानिक पक्षांच्या राजकिय …

Read More »

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी सुरुय

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील लोकसभा निवडणूकीसंदर्भात जागा वाटपाची चर्चा सुरु होती. मात्र मध्यंतरीच्या कालावधीत काही घडामोडी घडल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र भूमिका घेत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी बाबतची भूमिका जाहिर केली. …

Read More »

वंचितच्या भूमिकेवर नाना पटोले म्हणाले, आंबेडकरांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसचे एक पाऊल पुढे

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर …

Read More »

मविआतील वंचितच्या समावेशावरून रंगलेल्या राजकारणाचा पहिला टप्पा पूर्ण?

देशात लोकसभा निवडणूकीची घोषणा तसेच निवडणूकीसाठीची आचारसंहिता जाहिर होऊन जवळपास एक आठवड्याचा कालावधी झाला. त्यातच देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे या निवडणूकीत पूर्वीप्रमाणे एकाचवेळी दिसून येणारा प्रचाराचा धुराळा सध्या तरी सर्वच राज्यात दिसून येत नाही. मात्र पडद्या आड अनेक आघाड्या-बिघाड्यांचे राजकारण चांगलेच शिजत असल्याचे दिसून …

Read More »

संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय एकांगी त्यांनी…

शनिवारी प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरात काँग्रेसचे लोकसभा उमेदवार शाहु महाराज यांना बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरील युतीबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करताना म्हणाले की, शिवसेना उबाठा गटाबरोबरील युती आता राहिलेली नाही असे जाहिर करत आता जमलं तर महाविकास आघाडीसोबत युती नाही …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमचं टार्गेट ठरलेलं आहे…ती युती आता राहिली नाही

आमचं टार्गेट आम्ही ठरवले आहे, भाजपाला पराभूत करणे हेच आमचे टार्गेट आहे. यामुळे टार्गेट मिळवण्यासाठी छोटे-मोठे हेवेदावे आम्ही बाजूला सारत आहोत. आमचं म्हणणं आहे की, त्यांची भांडणं संपली पाहिजेत. त्यामुळे त्यांची भांडणं संपत नसल्यास आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी …

Read More »

शरद पवार यांचा इशारा,… तर तुमचेही बँक खाते बंद

ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढत आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यातून भाजपावर हल्लाबोल केला. इंदापूर येथे …

Read More »

इक्बाल सिंह चहल थेट मुख्यमंत्री कार्यालयातः आदित्य ठाकरे यांची टीका

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होताच निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झाले आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले. परंतु राज्य सरकारने राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या ऐवजी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना महानगरपालिकेच्या पदावर कायम ठेवण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर सुरु केला. मात्र अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इक्बालसिंह चहल यांची …

Read More »