Breaking News

Tag Archives: shivsena (UBT)

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, त्यांच्या पक्षांतर्गत बाब पण, शरद पवारांसारखे नेते… महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला नसून पवारांसारखे नेते राजकारण, समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. पवारांनी घेतलेला निर्णय ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत बाब …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा अमित शाहंना थेट इशारा, जमिन काय असते हे दाखविल्याशिवाय राहणार नाही… वज्रमुठ सेभेत शिंदे-फडणवीस सरकारसह विरोधकांवर साधला निशाणा

काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावर आलेले असताना तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जमिन दाखविणार असल्याचा जाहिर इशारा दिला. त्यानंतर शिवसेनेत फुट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्याच वक्तव्याचा धागा पकडत आज महाविकास आघाडीचे मुंबईतील वज्रमुठ सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव …

Read More »

संजय राऊत यांचा “त्या” व्हिडिओवरून सवाल, भाजपाचं हिंदूत्व इथे काय करत होते? फडणवीस आणि पोलिस खात्याला दिले चौकशीचे आव्हान

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी केली. संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला …

Read More »

नारायण राणे यांचा उध्दव ठाकरे यांना इशारा, येऊ द्या त्यांना कोकणात… ५ कोटी अॅडव्हान्स दिले ५०० कोटींचा व्यवहार झाला

कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात रणकंदन सुरू आहे. याप्रकल्पावरून समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. नाणारमधील रिफायनरी रद्द झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच बारसू जागेचा पर्याय दिला होता, असा दावा उदय सामंत यांनी केला. मात्र, आता बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेनेही विरोधी केला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी …

Read More »

उदय सामंत यांची बैठकीनंतर माहिती, बारसू प्रकरणी उध्दव ठाकरे यांना ब्रिफींग हवे असेल तर…. उद्योग मंत्री सामंत आणि खासदार राऊत यांच्यात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी बारसू येथे माती परिक्षण सुरू झाले. मात्र, हे माती परिक्षण सुरू होताच येथील ग्रामस्थांनी परिक्षणस्थळी आंदोलन पुकारले. या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पांगविण्यासाठी महिला, मुलांसह सर्वांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे येथील परिस्थतीत तणाव निर्माण झाला. परंतु …

Read More »

अजित पवार म्हणाले, चार-पाच लाख जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे बाजूने तर…. वेळ पडल्यास मीही आंदोलकांच्या भेटीला जाईन

बारसू येथील रिफायनरीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेले आहे. यावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अप्रत्यक्ष ठाकरे गटाच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी गरज पडल्यास जाईन असे सांगत आपली भूमिका …

Read More »

संजय राऊत यांची खोचक टीका, मोगलाईचे आदेश देऊन देवेंद्र फडणवीस मॉरिशसला… दिल्लीतील मोगलांच्या आदेशानुसार बारसूत घडत आहे

नाणारमध्ये रद्द केलेला तेलशुद्धीकरण प्रकल्प बारसूमध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण आणि माती परीक्षण सुरू असून, त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. याठिकाणी ४ दिवसांपासून स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे. अशातच आज २८ एप्रिल रोजी आंदोलकांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. …

Read More »

शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी ठोठावला ३ रूपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केला दावा दाखल

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शिरसाट अलिकडेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंबद्दल बोलत असताना त्यांनी एक बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आज २७ एप्रिल रोजी संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला. सुषमा …

Read More »

विनायक राऊत यांचा हल्लाबोल, माळरानाच्या दगडाची अन् करवंदीच्या…. महिला आंदोलकांना हाकलून लावले

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कठोर विरोध केला. माती परिक्षणाकरता अधिकारी आले असता त्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. यावेळी ग्रामस्थांनी तेथे आंदोलन छेडले. मात्र, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, या आंदोलकांना अटकही करण्यात आली होती. याप्रकरणी कोकणातील खासदार विनायक …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती; राऊत हे पत्रकार, ते तुम्हा पत्रकारांना अधिक माहित उध्दव ठाकरे यांच्याशी अद्याप या विषयावर चर्चा नाही

दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हाचलाची सुरू आहेत, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात बरीच चर्चा रंगली. त्यातच, मुख्यमंत्री सध्या साताऱ्यात असल्याने ते नाराज होऊन साताऱ्यात गेले असल्याच्या चर्चांनाही जोर आला आहे. त्यामुळे संजय राऊतांनी केलेला गौप्यस्फोट खरा ठरतोय की काय अशी …

Read More »