Breaking News

शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी ठोठावला ३ रूपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केला दावा दाखल

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शिरसाट अलिकडेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंबद्दल बोलत असताना त्यांनी एक बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आज २७ एप्रिल रोजी संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला.

सुषमा अंधारेंवर टीका करत असताना संजय शिरसाट म्हणाले होते की, “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत.” सुषमा अंधारे यांनी दाखल केलेल्या अब्रु नुकसानीच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांना ते वक्तव्य भोवणार असं बोललं जात आहे.

दरम्यान, न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, ही लढाई कोणत्याही आर्थिक लाभासाठी नाही तर केवळ महिलांच्या सन्मानासाठी आहे. महिलांबद्दल अभद्र बोलणाऱ्या शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला चाप बसावा यासाठी ही लढाई आहे. राज्यातल्या लेकी-बाळींबद्दल, महिलांबद्दल अत्यंत अश्लाघ्य आणि अभद्र बोलणाऱ्या शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला समज देणे हा एकच उद्देश आहे.

काही दिवसांपूर्वी अंधारे यांना विचारण्यात आलं होतं की, तीन रुपयांचाच दावा का? त्यावर अंधारे म्हणाल्या होत्या, मी एक मध्यमवर्गीय असून, अब्रूशिवाय दुसरे काही जपायला आमच्याकडे नाही. त्याचबरोबर अब्रूची किंमत कशातच करता येत नाही. लाखो कोटी रुपयांमध्येही करता येत नाही. त्यामुळे मला यामध्ये कोणत्याही आर्थिक लाभात नको. मी भटक्या विमुक्तमधून येते. आमच्याकडे एक स्वतंत्र न्याय व्यवस्था चालते. त्यामध्ये महिलांचा अवमान करणं हा सर्वात गहन अपराध समजला जातो. त्यामध्ये शिक्षा म्हणून गुन्हेगाराला तीन रुपयांचा दंड ठोठावला जातो. ती शिक्षा ठोठावल्यानंतर संबधित आरोपीला जनावर म्हणून ओळखले जाते असा खोचक टोलाही लगावला.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *