Breaking News

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या उमेदवारांच्या लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता करण्यात आली. बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगताही आज इंदापूरमधील सभेने शरद पवार यांनी केली. यावेळी झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या समर्थकांना चांगलाच सज्जड इशारा दिला.

इंदापूरमधील जाहिर सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, ही लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. देशाची सत्ता भाजपाकडे आहे. सत्तेत आल्यानंतर भाजपाने ज्या पध्दतीने निर्णय घेतले. त्या निर्णयामुळे देशातील एक मोठा वर्ग अस्वस्थ आहे. त्यामुळे देशाचे राजकारण योग्य ट्रॅकवर आणणे महत्वाचे झाले आहे. यातूनच विविध राजकिय पक्षाच्या लोकांना एकत्रित आणत इंडिया आघाडीची स्थापना केली. त्यानंतर देशातील वातावरण बदलायला लागले आहे. केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाममध्ये भाजपाची सत्ता आहे. तर याशिवाय अनेक राज्यात भाजपाची सत्ता नाही. मात्र देशाचा कारभार योग्य पध्दतीने करायचा असेल तर भाजपाचा पराभव केल्याशिवाय पर्याय नाही असेही सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आपल्याकडे महाराष्ट्रातही काही राजकिय पक्ष आहेत. आपल्या भागातही आहेत. त्या पक्षाच्या नेत्यांकडून दमदाटी करत कुठे पाणी देणार नाही म्हणणे, नोकरी देणार नाही म्हणणे, हे त्यांचे वैशिष्ट आहे. एकप्रकारे दमदाटी करून हव्या त्या रस्त्याने लोकांना नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या गोष्टीकडे बारकाईने पाहिले पाहिजे असे सूचक विधानही यावेळी केले.

शरद पवार पुढे म्हणाले की, इंदापूरमधील काही लोकांनी आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना सांगण्यात आले की, आम्ही तुमच्या शेतातील पाणी बंद करू. शेतीचे पाणी हे कुणाच्या बापाची इस्टेट नाही. मी त्यांना एवढंच सांगतो की मामा जरा जपून सरळ करायला जराही वेळ लागणार नाही तुझ्यासाठी काय केलं नाही, दुकानात मदत पाहिजे होती, त्यामध्ये मदत केली, लहान कुटुंबातील लोकांना मदत करणे पाठिंबा देणे गरजेचे असते ती भूमिका मी घेतली. मात्र आज त्यांचे पाय सत्तेमुळे जमिनीवर राहिले नाहीत. त्यांचे पाय हवेत आहेत, आज मी एवढं सांगतो की कोणीही सत्तेचा गैरवापर करून दमदाटी करत असेल तर त्याला सरळ करायला एक दोन दिवसात करू शकतो पण आज त्या रस्त्याने जायचे नाही असा सूचक शब्दात अजित पवार समर्थक आमदाराला इशारा दिला.

दरम्यान इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना टोपणनावाने मामा म्हणून राजकिय क्षेत्रात ओळखले जाते. त्यामुळे शरद पवार यांनी मामा म्हणून उल्लेख करताच हे मामा म्हणजे दत्ता मामा भरणे असल्याचे उपस्थितांमध्ये लगेच लक्षात आले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *