Breaking News

पिडीत महिला अपहरण प्रकरणी एच डी रेवन्ना यांना अटक

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल-भाजपाचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने घरातील महिलेवरच जबरदस्ती करत बलात्कार केल्याची कथित व्हिडिओ व्हायरल झाली. त्यानंतर प्रज्वल रेवन्ना परदेशी पळून गेल्याचे सांगण्यात येऊ लागले. तसेच प्रज्वल रेवन्नाचे वडील तथा कर्नाटक जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदार एच डी रेवन्ना यांनी कथित पिडीत महिलेचे अपहारण केल्याची तक्रार पिडीत महिलेच्या मुलाने दाखल केली. त्यानंतर आज एच डी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली.

एच डी रेवन्ना हे JD(S) आमदार असून प्रज्वल रेवन्नाचे वडील आहेत. एच डी रेवन्ना यांना त्यांचे वडिल आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या घरातून अटक करण्यात आल्याची माहिती कर्नाटकच्या पोलिस दलातील सूत्रांनी वृत्तसंस्थांना दिली.

अपहरण प्रकरणात अटकेपासून अंतरिम संरक्षणाची विनंती बेंगळुरू न्यायालयाने फेटाळल्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या पथकाने एचडी रेवन्ना यांना लगेचच ताब्यात घेतले. त्याच्या सहकाऱ्याने २० वर्षीय व्यक्तीच्या आईचे अपहरण केल्याच्या आरोपानंतर एच डी रेवन्ना अपहरण प्रकरणाचा सामना करत आहे. तक्रारदार राजू एच डी हे त्याच्या आईसोबत रेवन्नाच्या फार्महाऊसवर घरकाम करत होती. रेवण्णाचा नातेवाईक सतीश बबन्ना याने २९ एप्रिल रोजी या महिलेचे तिच्या घरातून अपहरण केले होते आणि कालेनल्ली येथील आमदारांचे निकटवर्तीय सहाय्यक राजशेखर यांच्या फार्महाऊसवर तिला बंदिस्त केले होते. आदल्या दिवशी कर्नाटक पोलिसांनी महिलेची सुटका केली होती.

जेडीएस आमदार एच डी रेवन्ना याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३६४ए (अपहरण) आणि कलम ३६५ (जबरदस्ती प्रतिबंध) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसेचकर्नाटक पोलिसांनी अजामीनपात्र कलमे लावली होती.

प्रज्वल रेवन्ना हा परदेशात पळून गेल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरोधात सीबीआयला ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती एसआयटीच्या पथकाने केली आली आहे. एचडी रेवन्ना, त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्यासह लैंगिक अत्याचार आणि या कृत्याचे चित्रीकरण केल्याच्या गंभीर आरोप आहे.

प्रज्वल रेवन्ना हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे, हसन येथून भाजपा-जेडी(एस) युतीचा उमेदवार आहे. २६ एप्रिल रोजी त्यांच्या मतदारसंघात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान झाले.

प्रज्वल २७ एप्रिल रोजीच परदेशात रवाना केल्याचे सांगितले जाते, म्हणजे २६ एप्रिल रोजी कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर प्रज्वल रेवन्ना परदेशात पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

सीएए कायद्यांतर्गत ३०० जणांना भारताचे नागरीकत्व बहाल

केंद्र सरकारने १५ मे रोजी नागरिकत्व (सुधारणा) कायदा अर्थात सीएए (CAA) अंतर्गत, २०१९ अंतर्गत अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *