Breaking News

भारत निवडणूक आयोगाचे खर्चविषयक निवडणूक निरीक्षक दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या निवडणूक निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई उत्तर मतदासंघासाठी दीपेंद्रकुमार आणि नेहा चौधरी निवडणूक निरीक्षक

२६- मुंबई उत्तर मतदासंघाकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार आणि नेहा चौधरी यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. दीपेंद्रकुमार यांचा मोबाईल क्रमांक 8928567686 असा आहे. ते विधानसभेचे १६०-कांदिवली पूर्व, १६१ चारकोप आणि १६२- मालाड पश्चिम या मतदासंघांचे खर्च निरीक्षक असतील. तर, श्रीमती चौधरी या विधानसभा मतदारसंघ १५२ बोरिवली, १५३ दहिसर आणि १५४ मागाठाणे) साठी खर्च निरीक्षक असतील. श्रीमती चौधरी यांचा संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक 9372791082 असा आहे.

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती निवडणूक निरीक्षक

२७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरिता निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. नागरिकांसाठी खर्च निरीक्षकांनी त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक असा : राजकुमार चंदन (मोबाईल क्रमांक – 9321405417) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ १५८- जोगेश्वरी पूर्व, १५९- दिंडोशी, १६३- गोरेगाव, तर किरण के. छत्रपती (मोबाईल क्रमांक – 8928571922) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ १६४- वर्सोवा, १६५-अंधेरी पश्चिम, १६६- अंधेरी पूर्वच्या खर्च निरीक्षणाशी संबंधित समस्यांबाबत तक्रारींसाठी संपर्क साधावा, असे आवाहन खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक चंदन, छत्रपती यांनी केले आहे.

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी डॉ.सुनील यादव निवडणूक निरीक्षक

२८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी डॉ. सुनील यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. खर्चविषयक बाबी आणि आचारसंहितेच्या अनुषंगाने तक्रारी असल्यास 8130122499 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. यादव यांनी केले आहे

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी सूरजकुमार गुप्ता निवडणूक खर्च निरीक्षक

२९- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुरजकुमार गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) गुप्ता यांचे कार्यालय हे २९- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व, मुंबई 400051 येथे असून त्यांचा संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक 8591369100 असा आहे.

Check Also

मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *