Breaking News

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचा प्रचार थंडावला

लोकसभा निवडणूकीसाठी तिसऱ्या टप्प्यासाठी सुरु असलेला प्रचार आज थंडावला. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा शेवटच्या दिवस असल्याने जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी जाहिरसभांच्या माध्यमातून आणि रोड शोच्या माध्यमातून आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला.

तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघातील प्रचार आज संपला. या ११ लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मंगळवारी मतदान होणार आहे. तर ११ मतदारसंघात जवळपास २५८ उमेदवार उभे राहिले आहेत. सर्वाधिक उमेदवारा माढा लोकलसभा मतदारसंघात उभे असून या मतदारसंघात एकूण ३२ उमेदवार उभे आहेत. तर सर्वात कमी उमेदवार रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात असून या लोकसभा मतदारसंघात अवघे ९ उमेदवार उभे आहेत.

या ११ लोकसभा मतदारसंघात जवळपास २ कोटी ९ लाख ९२ हजार ६१६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे २५८ मतदारांचे भवितव्य ७ मे रोजी मतदारसंघात ईव्हिएम मशिन बंद होणार आहे. आज दुपारनंतर आणि उद्या दिवसभरात कोणत्याही राजकिय पक्षाला प्रचार करता येणार नाही. याशिवाय महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघासह देशभरातील एकूण १८ राज्यातील ९४ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठीही ७ मे रोजी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा परिणाम किती प्रमाणात पडतो हे दिसून येणार आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सर्वाधिक प्रचार सभा माढा, पुणे, सोलापूर उस्मानाबाद, लातूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या आहेत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *