Breaking News

Tag Archives: लोकसभा निवडणूका २०२४

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ‘सखी मतदान …

Read More »

राहुल गांधी यांचा थेट सवाल, मोदीजी घाबरलात का?

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्यातच पुन्हा एकदा भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्यातच आज आंध्र प्रदेशमधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधत निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राहुल गांधी यांनी अचानकपणे …

Read More »

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचा प्रचार थंडावला

लोकसभा निवडणूकीसाठी तिसऱ्या टप्प्यासाठी सुरु असलेला प्रचार आज थंडावला. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा शेवटच्या दिवस असल्याने जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी जाहिरसभांच्या माध्यमातून आणि रोड शोच्या माध्यमातून आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला. तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, …

Read More »

नाना पटोले यांची टीका, नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा, १० वर्ष केवळ जगभर भटंकती…

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत. काँग्रेस मंगळसूत्र व स्त्रीधन हिसकावून घेऊन मुस्लीमांना देणार अशी विधाने पंतप्रधानांना शोभत नाहीत. सातत्याने खोटे बोलत महाराष्ट्रभर फिरणारे नरेंद्र मोदीच खरे भटकते आत्मा आहेत. मोदींनी कोणती पदवी घेतली हे माहित नाही पण त्यांना जाहिरनामा वाचता …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात ६२.७१ टक्के मतदान

मागील काही दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणूकीच्या प्रचारामुळेही राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. त्यामुळे लोकसभा उमेदवारासाठी मतदानाचा दिवस असूनही आपले राष्ट्रीय कर्तव्य अर्थात मतदार राजा सकाळ आणि संध्याकाळच्या कमी उन्हाच्या कालावधीतच घराबाहेर पडत आहे. यापार्श्वभूमीवर काल दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात जवळपास …

Read More »

प्रियंका गांधी यांचा सवाल,… तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?

देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदी सरकारने ती भरली नाहीत. बेरोजगारीबरोबरच महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस सिलिंडर, खाद्यतेल, सोने, चांदी सर्वांच्या महागाईची भेट मोदींनी दिली. शेती साहित्यावर जीएसटी लावला, सर्व बाजूंनी मोदी सरकारने जनतेला संकटात टाकले आहे.नरेंद्र …

Read More »

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज भारताचा विकास दर ६.८ वर राहणार २०२५ मध्ये तो ६.५ टक्के राहण्याचा अंदाज

देशांतर्गत मागणीत अपेक्षित वाढ झाल्यामुळे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मंगळवारी चालू आर्थिक वर्षासाठी भारतासाठी ३० आधार अंकांनी वाढीचा अंदाज ६.८ टक्क्यांवर नेला. तथापि, वित्तीय वर्ष २६ साठीच्या अंदाजांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. “भारतातील वाढ २०२४ मध्ये ६.८ टक्के आणि २०२५ मध्ये ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे, देशांतर्गत मागणी आणि वाढत्या कामाच्या …

Read More »

महाविकास आघाडीचं ठरलं, कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणाचा उमेदवार

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होवून जवळपास २० ते २५ दिवस झाले. पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाच जागांवर निवडणूकीची प्रक्रियाही आता थोड्याच कालावधीत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मविआ अर्थात महाविकास आघाडीने गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख …

Read More »

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ …

Read More »