Breaking News

प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधात सीबीआयकडून ब्लू कॉर्नर नोटीस

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल एस चे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कॅडलचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर प्रज्वल रेवन्ना हे परदेशात पळून गेल्याची माहिती पुढे आल्यानंतर या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून एसआयटीची स्थापना केली. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ४ मे रोजी प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कँडलची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांनी माहिती दिली की हसन खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात सीबीआयकडून “ब्लू कॉर्नर नोटीस” जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

सिद्धरामय्या यांनी SIT अधिकाऱ्यांसोबत “महत्त्वाची बैठक” घेतली, या बैठकीत प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. आम्ही योग्य उपाययोजना करून अटकेसाठी पुढे जाऊ. सीबीआय ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तपासाला गती मिळेल, असे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
“एसआयटी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की विमानतळांवरून माहिती मिळताच ते अटक करतील आणि आरोपींना परत आणून देतील , असे त्यात म्हटले आहे.

एखाद्या गुन्ह्याशी संबंधित व्यक्तीची ओळख, स्थान किंवा त्याच्या वर्तणूकीबद्दल त्याच्या सदस्य देशांकडून अतिरिक्त माहिती संकलित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य संस्थेद्वारे ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, एसआयटीने भारतातील इंटरपोल प्रकरणांसाठी नोडल संस्था असलेल्या सीबीआयला प्रज्वल रेवन्नाविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीसची विनंती पाठवली आहे.

सीबीआयने ही नोटीस जारी केल्यानंतर, एसआयटीला प्रज्वल रेवन्नाच्या ठावठिकाणाविषयी माहिती मिळण्याची आशा आहे. ३३ वर्षीय प्रज्वल रेवन्ना, जो माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे, हसन येथून भाजपा-जेडी(एस) युतीचे उमेदवार म्हणून यावेळी दुसऱ्यांदा निवडणूकीसाठी उभे आहेत. हसन मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाले.

प्रज्वल रेवन्ना यांचा समावेश असलेल्या स्पष्ट व्हिडिओ क्लिप अलीकडच्या काही दिवसांपासून हसनमध्ये व्हायरल झाल्या होत्या, त्यानंतर राज्य सरकारने या सेक्स स्कॅडलची चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली. कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर २७ एप्रिल रोजी प्रज्वल रेवन्ना परदेशात गेले होते. त्याच्या वकिलाने त्याला एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी सात दिवसांचा अवधी मागितला होता, ज्याला तपास पथकाने उत्तर दिले आहे की अशी कोणतीही तरतूद नसल्याने हे शक्य नाही.

अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सांगितले की या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्वल रेवन्ना “बेपत्ता” आहे आणि त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे, आणि सखोल शोध देखील घेतला जात आहे. प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी. या प्रकरणात गुंतलेल्यांवर निर्णायक आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशा कठोर सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याने या प्रकरणात निष्काळजीपणा आणि दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे संबधित पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *