Breaking News

असादुद्दीन ओवेसी यांचा आरोप, …भाजपा आणि आरएसएस हे खोटे…

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला उद्देशुन जास्त मुले असणाऱ्यांमध्ये हिंदूची जास्तीची संपत्ती काढून वाटणार असल्याची टीका काँग्रेसवर निशाणा साधताना केली होती. त्यावर हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना उत्तर देताना शनिवारी सांगितले की, भारतात मुस्लिम पुरुष सर्वाधिक कंडोम वापरतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू समाजामध्ये द्वेष पसरवण्यासाठी खोटेपणा पसरवत असल्याचा आरोपही असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

पुढे बोलताना असादुद्दीन ओवेसी म्हणाले की, “पंतप्रधान म्हणत आहेत की मुस्लिम जास्त मुले जन्माला घालत आहेत. खुद्द मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार मुस्लिमांचा प्रजनन दर घसरला आहे, पण तो म्हणतोय की आम्ही जास्त मुले जन्माला घालत आहोत. भारतात मुस्लिम बहुसंख्य होतील, असा दावा करण्यासाठी भाजपा आणि आरएसएस हे खोटे पसरवत आहेत, अशी टीकाही यावेळी केली.

हैदराबादमधून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या असादुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी जाहीर सभेत सांगितले.

गेल्या आठवड्यात, राजस्थानमध्ये बोलताना, पंतप्रधान मोदींनी आरोप केला की, काँग्रेस सत्तेवर आल्यास, “ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना” देशाची संपत्ती वाटली जाईल. या टीकेमुळे मोठी खळबळ उडाली. यानंतर काँग्रेसने पंतप्रधानांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आणि भाजपाला नोटीस बजावण्यात आली होती.

असादुद्दीन ओवेसी यांनी पुढे पंतप्रधान मोदींवर भीती निर्माण केल्याचा आरोप केला आणि आरोप केला की ते २००२ पासून मुस्लिम-दलित द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत पुढे म्हणाले की, प्रत्येक वृत्तपत्र मोदी की हमी लिहिते. मोदी की हमी एकच आहे, ती म्हणजे दलित आणि मुस्लिमांबद्दलचा द्वेष. किती दिवस हा द्वेष पसरवत राहणार? आमची श्रद्धा आणि धर्म भिन्न आहेत, पण आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, अशी आठवणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करून दिली.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असादुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवित म्हणाले की, मुस्लिमांना “घुसखोर” म्हणून संबोधल्यावरून म्हणाले की, “मी त्याला (नरेंद्र मोदी) टीव्हीवर पाहत होतो. लोक मला त्याचे भाषण दाखवत होते. मी त्यांना विचारले, तुम्हाला आश्चर्य का वाटत आहे, हाच मोदींचा खरा चेहरा आहे, असेही यावेळी जाहिर सभेत सांगत “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास म्हणत तो सर्वांची फसवणूक करत असल्याचेही शेवटी सांगितले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *