Breaking News

आदित्य ठाकरे यांचा सवाल, चिकन मटन मासे खाण्यावर बंदी आणणारे सरकार…

उपस्थित जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद आणि उत्साह पाहून विजयाची खात्री असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले . तसचं ‘लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात एक नवी चळवळ निर्माण करणारी आहे. ह्या चळवळीतून निर्माण होणारी ऊर्जा आणि आपल्या महाराष्ट्राची माती दिल्लीचा तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही.’ हा विश्वास उपस्थितांना दिला.

मोदी सरकारच्या घोषणांवर आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका करताना म्हंणाले की ‘भाजपाच्या ४०० पारचं आता तडीपार होणार. दहा वर्षे हे सरकार एका व्यक्तीचे एका पक्षाचे होतं. जनतेने फक्त मन की बात ऐकायचं, पण जनतेच कधी ऐकलंय का ? असा सवाल करत १० वर्षांपूर्वी जे जुमले होते त्याचे नाव आता केवळ गॅरेंटी असे दिलंय असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पण भाजपला जेमतेम २०० पर्यंत जागा येतील. १० वर्षे मनात होते तशी सत्ता गाजवली. पण मटण, चिकन, मासे खायचे बंद करणारे सरकार चालणार आहे का ? १०० स्मार्ट सिटी होणार होत्या १ तरी सिटी तयार झाली का? भाजपाने १० वर्षे सत्ता भोगली आणि आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं. काल फडणवीस म्हणाले कोरोना लस मोदींनी बनवली पण ही लस महाराष्ट्रात तयार झाली, आपल्या पुण्यात झाली.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, केंद्राने सांगितलं की तुम्ही लसीला हात लावू नका ही आमच्या पद्धतीने लस देणार. महाराष्ट्रात नाही तर देशात कुणाला हे सरकार आपलं वाटतं नाही. चीन विरोधात वापरायला पाहिजे होतं ते सैन्य दिल्लीत शेतकऱ्यांवर वापरले. एकही भूल कमल का फुल असा प्रतिसाद नागरिक आता देतात. असं म्हणत एक मन की बात नहीं होगी सबके मन की बात होगी. असा इशाराही यावेळी सरकारला दिला .

शाहू महाराजांविरोधात भाजपा गद्दाराला उभं करेल असं वाटत नव्हतं

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना छत्रपती आणि ठाकरे घराण्याच्या जुन्या समंधांना आदित्य ठाकरेंनी उजाळा दिला . ते म्हणाले की ‘शाहू महाराज उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर समोर कुणी उभ रहायला नको होतं, या घराण्याचं आणि माझ्या घराण्याचं वेगळं नातं आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे चांगले संबंध होते’.

आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि गद्दारांचा समाचार घेतला ‘देशाच्या हितासाठी आम्ही महाविकास आघाडी निर्माण केली होती. २०१९ साली बंटी साहेब यांनी मला सांगितलं होतं आदित्य काळजी करू नको आमचं ठरलंय. शाहू महाराज यांच्या विरोधात भाजपा एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं’. असं म्हणत टीका केली .

या दोन्ही सभांना सभेला काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हांडोरे, आमदार सत्यजित पाटील, ऋतुराज पाटील, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, युवासेना कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते .

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *