Breaking News

अजित पवार म्हणाले, चार-पाच लाख जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे बाजूने तर…. वेळ पडल्यास मीही आंदोलकांच्या भेटीला जाईन

बारसू येथील रिफायनरीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेले आहे. यावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अप्रत्यक्ष ठाकरे गटाच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी गरज पडल्यास जाईन असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार हे पुण्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील भूमिका स्पष्ट केले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, रिफायनरीसाठी बारसूची जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच सुचवली होती, ठाकरे गटाचे खासदार या प्रकल्पाला विरोध दर्शवत आहेत. मात्र तरीही या भागातून ४-५ लाख जनतेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार मात्र प्रकल्पाच्या समर्थनार्थ बोलत आहेत. त्यामुळे जर स्थानिक जनतेचा विरोध असेल तर विकासासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी स्थानिकांची बाजू ऐकून घेतली पाहिजे, त्यांचे मनातील गैरसमज दूर होई पर्यंत सॉईल टेस्टींगचे काम थांबवावे अशी मागणी केली.

बारसू येथील रिफायनरीला विरोध करण्यासाठी नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलकावर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली आहे. त्या प्रश्नावर अजित पवार यांनी भूमिका मांडली. यावेळी अजित पवार म्हणाले की, बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच माझे देखील उदय सामंत यांच्यासोबत बोलणे झाले आहे. त्या प्रकल्पामुळे तेथील गावांचा किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, याबाबत उदय सामंत यांनी सांगितले आहे. पण तेथील नागरिक जर विरोध करत असतील तर त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे शंकांचे निरसन होईपर्यंत सर्वेक्षण थांबवले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. तसेच गरज पडल्यास मी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास जाईल, अशी भूमिका देखील मांडली.

तसेच अजित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेहमीच विकासाबाबत सकारात्मक भूमिका राहिली आहे. आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर गेलेले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल तर, जनजीवन, मासेमारी, पर्यटन यावर परिणाम होणार नसेल तर विरोधकांना समजून सांगावं, यात संवेदनशीलता सरकारने दाखवावी, समज गैरसमज दूर करावेत. चर्चेतून मार्ग निघू शकतो.

ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली खासदार विरोध करतात, पण मी राजन साळवींचं स्टेटमेंट मी पाहिलं आहे. ते या भागाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचं मात्र म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे. चार-पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आमदार म्हणतात की आमचा पाठिंबा आहे, त्यामुळे कायमचं नुकसान होणार असेल, भावी पिढी बराबद होणार असतील, तर जरूर विरोध केला पाहिजे. यात दुमत नाहीच यातून फायदा होणार असेल, आर्थिक सुबत्ता येणार असेल, तर या अँगलने विचार केला पाहिजे, अशी अप्रत्यक्ष सूचनाही ठाकरे गटाच्या नेत्यांना अजित पवार यांनी केली.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *