Breaking News

Tag Archives: ncp

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटे नॅरेटीव्ह, तर अजित पवार यांची ग्वाही उत्तरे आमच्याकडे विरोधकांच्या पत्रातील मुद्यावरून सरकारची तयारी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाला उद्या सकाळपासून सुरुवात होणार आहे. राज्य सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर सह्याद्री येथील चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य सरकारच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी राज्य …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत, सरकार कुठे आहे? उष्माघाताने किती लोकांचा मृत्यू झाला? हे सरकारने जाहीर करावे!

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्याच्या विविध भागात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्यासाठी वणवण करताना अनेक माता भगिणींनी आणि लहान मुलामुलींनी जीव गमावला आहे. कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोट आणि दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण …

Read More »

अजित पवारांनी आव्हान दिलेल्या डॉ अमोल कोल्हे नी एक लाख मतांचा टप्पा पार केला अजित पवार पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील मागे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख अजित पवार यांनी लोकसभा निवडणूका सुरु होण्यापूर्वी शिरूरचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांना परत निवडूण येतोस कसा बघतोच म्हणून आव्हान दिले होते. मात्र लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर होण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली. मात्र या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार …

Read More »

डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्‍या भगेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील यांची मागणी

मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड यांनी डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आणि ती पायदळी तुडवली त्यामुळे भगेंद्र आव्हाडांवर राज्यसरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याला जितेंद्र आव्हाड …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, घड्याळ चिन्ह आणि शरद पवारांचा फोटो का वापरता?

सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडत राज्यातील शरद पवार आणि अजित पवार अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने १४ मार्च रोजी खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि निवडणूक चिन्ह म्हणून मान्यता दिली आहे असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने आज अजित …

Read More »

राज ठाकरे मनसैनिकांना म्हणाले, वडा टाकला की तळूनच बाहेर आला पाहिजे …

राज्यात खऱ्या अर्थाने फक्त तीनच राजकिय पक्ष स्थापन झाले. पहिला जनसंघ दुसरी शिवसेना आणि तिसरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आज जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश दिसतय ना ते यश काही आजचे नाही. त्यांचा सर्वात आधी पहिला पहिला पक्ष स्थापन झाला तो जनसंघ आणि त्यानंतरचा भाजपा. पण आज जे काही …

Read More »

विजय वडेट्टीवारांनी आशा सेविकांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करताच अजित पवार म्हणाले…

आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली. विधानसभा सभागृहात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कामकाज सुरु होताच पुरवणी मागण्या मांडण्यास सुरुवात केली. परंतु त्याचवेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मध्येच मागील दिड महिन्यापासून राज्यातील आशा सेविकांकडून मानधनवाढीच्या मुद्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर काहीशा चिडलेल्या अजित पवार …

Read More »

अजित पवार यांचा उपरोधिक टोला, मी सत्तेसाठी हपापलेला नाही…

विरोधकांना दुसरा मुद्दा राहिलेला नसल्याने एकमेकांची उणीधुणी काढून हेडलाईन मिळवायची हे काम उरलेले आहे असा टोला लगावतानाच आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्रवक्ते, कार्यकर्त्यांनी अशा मुद्यांवर बोलताना मर्यादा बाळगायला हवी. आपल्या वक्तव्यातून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. निवडणुकीसाठी उरलेले काही दिवस सर्वांनी मिळून जोरकसपणे काम करा असे आवाहन राष्ट्रवादी …

Read More »

राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाचे एकच मुख्य कार्यालय ?

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मंत्रालयासमोर आपले कार्यालय थाटले असले तरी या कार्यालयाला संपर्क कार्यालय असे नाव दिले असून राष्ट्रवादीचे मुख्य कार्यालय म्हणून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बॅलार्ड पियर येथील कार्यालयाचाच पत्ता दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले …

Read More »

वंचितला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिडतास खोलीच्या बाहेर बसविले

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज बोलाविलेल्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना जागावाटपाच्या चर्चेसाठी हॉटेल ट्रायडंट येथे बोलावले. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित नेते धैर्यशील पुंडकर यांचे स्वागत केले. परंतु वंचितच्या नेत्यांना प्रस्तावाची माहिती विचारली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमची चर्चा झाल्यावर …

Read More »