Breaking News

वंचितला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिडतास खोलीच्या बाहेर बसविले

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज बोलाविलेल्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना जागावाटपाच्या चर्चेसाठी हॉटेल ट्रायडंट येथे बोलावले. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित नेते धैर्यशील पुंडकर यांचे स्वागत केले. परंतु वंचितच्या नेत्यांना प्रस्तावाची माहिती विचारली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमची चर्चा झाल्यावर तुम्हाला बोलवतो असे सांगून दिड तासाहून अधिक काळ चर्चेच्या खोलीतून बाहेर बसण्यास सांगण्यात आल्याचा आरोप वंचितचे नेते धैर्यशील पुंडकर यांनी केला.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या आमंत्रणावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यशील पुंडकर हे चर्चेसाठी पोहोचले. त्यावेळी चर्चेच्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाच्या पराभवासाठी वंचितचा कोणता प्रस्ताव आहे अशी विचारणा केली. तसेच कोणत्या जागांची तयारी केली अशी विचारणा करण्यात आल्याचे धैर्यशील पुंडकर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

त्यावर धैर्यशील पुंडकर म्हणाले की, महाविकास आघाडीचे धोरण आणि जागा वाटपाचा माहिती मिळाल्याशिवाय कोणतीही भूमिका मांडणार नसल्याचे सांगत आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या भूमिकेबाबत आणि जागांबाबत ठरवावे आणि त्यानंतर वंचित कडून जागांची मागणी करण्यात येईल असे सांगितले.

त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचित नेते धैर्यशील पुंडकर यांना खोलीच्या बाहेर बसण्यास सांगत आमची भूमिका ठरली की आम्ही तुम्हाला बोलावतो असे सांगत खोलीच्या बाहेर बसण्यास सांगितले. त्यानंतर जवळपास एक तास ते दिड तास झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुंडकर यांना खोलित चर्चेसाठी बोलावले नाही. तसेच धैर्यशील फुंडकर म्हणाले की, जर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे प्रस्ताव तयार नसेल तर वंचित बहुजन आघाडीने यापुर्वी सुचविलेल्या १२ १२ जागांचा प्रस्ताव मान्य करावा अशी मागणीही धैर्यशील पुंडकर यांनी केली.

तसेच धैर्यशील पुंडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चेला तर बोलावले. मात्र अद्याप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला मविआत सहभागी केल्याचे पत्र दिले नसल्याचे सांगितले.

अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जयंत पाटील, नाना पटोले आणि संजय राऊत यांनी संयुक्तरित्या एकपत्र जाहिर करत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सहभागी करून घेतल्याचे पत्र जाहिर केले. त्यावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचितला सहभागी केलेले ते पत्र अद्याप आम्हाला मिळालेले नाही असेही स्पष्ट केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘स्किल सेंटर ऑन व्हील’ बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास व उद्योजकता, नाविन्यता मंत्री मंगल प्रभात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *