Breaking News

Tag Archives: vanchit bahujan aghadi

वंचितचा आरोप, सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यापाठोपाठ सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनीही आता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सत्ताधारी पक्षांनी धमकावल्याने अर्ज मागे घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला. वंचित बहुजन …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा

आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींविषयी त्यांनी केलेले द्वेषपूर्ण भाषण आणि जातीय आधारावर मतदान करण्याचे आवाहन त्यांच्या जिंकण्याच्या उदासीनतेबद्दल बरेच काही सांगून जाते. यामुळेच वंचित बहुजन आघाडीने त्यांना द्वेषपूर्ण, जातीयवादी आणि मौत का सौदागर असे नाव का दिले आहे हे सिद्ध होत असल्याची टीका नरेंद्र मोदी यांच्यावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या …

Read More »

उत्कर्षा रूपवते शिर्डीतून ‘वंचित’कडून रिंगणात

वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सहावी यादी जाहीर झाली आहे. यात शिर्डी मतदार संघातून उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर साताऱ्यातून माजी सैनिक असलेल्या प्रशांत कदम यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, NRC आणि CAA कायदा मुस्लिम नव्हे तर VJNT विरोधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मिलिंद इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, पराग गवई आदी उपस्थित होते. यावेळी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, आमच्या पक्षाला बदनाम करण्याचे निरर्थक प्रयत्न

भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही पैसे देऊन पोसलेल्या फेक न्यूज मशिनरीद्वारे माझ्याविरुद्ध खोटा प्रचार चालवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी ते मुद्दाम चुकीचे कोट केलेले ग्राफिक सगळीकडे फिरवत आहेत. या दोन्ही दलित, आदिवासी, ओबीसी, …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, …भाजपासोबत दोन हात करून मोकळं होवू

शाम मानव, तुषार गांधी आरोप करत आहेत. मी अनेक नावं घेऊ शकतो की, जे म्हणत आहेत हे उभे कसे राहिले. आम्ही पक्ष म्हणून उभे राहिलो आहोत. तुम्हाला वाटत असेल, की भाजपा हरली पाहिजे, तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडा. भाजपासोबत दोन हात करून आम्ही मोकळं होवू, तुमच्यासारखे आम्ही भित्रे नाही. आम्ही …

Read More »

राज्यात पुन्हा गांधी विरूध्द आंबेडकर राजकीय वाद

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना आगामी निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये असे जाहिर वक्तव्य केले. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांच्यावर पलटवार केला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गांधी विरूध्द आंबेडकर असा वाद पाह्यला मिळाला. तुषार गांधी यांनी केलेल्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल, मोदींना देश तोडायचाय…

राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत केला. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणतात की पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे सूचक विधान, एकाबाजूला चीन अन्…

स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर या सरकारला आणि भाजपाच्या उमेदवाराला पाडा, तरच तुमचे स्वातंत्र्य अबाधित राहील. नाहीतर लोकशाहीची हुकूमशाही कधी होईल, हे सुध्दा कळणार नसल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. भाजपचा समाचार घेताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की, पाहिजे तेवढे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, वंचितच्या नादी लागू नका कपडे फाडण्यात एक्सपर्ट

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजपा जवळची वाटत होती, त्यांना आता असुरक्षित वाटू लागले असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले. पुढे बोलताना प्रकाश …

Read More »