Breaking News

Tag Archives: ncp

नाना पटोले यांचा आरोप, तिजोरी लुटण्यासाठी दिल्लीत अदानी तर मुंबईत अजय आशर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार ‘हम करेसो कायदा’

राज्यात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून जनतेच्या पैशाची लूट सुरु आहे. मागील ९-१० महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. जी-२० परिषदेच्या बैठकांवर वारेमाप पैशांची उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. दिल्लीत अदानीच्या रुपाने तर राज्यात अजय अशरच्या रुपाने सरकारी तिजोरी लुटण्यासाठी बसवले आहे, असा घणाघाती आरोप …

Read More »

अर्थसंकल्पिय अधिवेशनाबाबत अजित पवार यांची मोठी प्रतिक्रिया, माझ्या राजकिय कारकिर्दीतले…. तुम्हाला राज्यात सत्ता हवी, मंत्री व्हायचे आहे, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरीटी पाहिजे, पण काम करायचे नाही हे कसं चालेल

मला खेद, दुःख एका गोष्टीचे आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीतले हे पहिले अधिवेशन असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची सभागृहातली उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ, अध्यक्षांवर अनेकदा आली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीत त्रुटी राहिल्याने माहिती सुधारुन घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावे लागले. विधिमंडळ कामकाजाबद्दल, सरकारची एकप्रकारे अनास्था, …

Read More »

राहुल गांधींच्या कारवाईवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन… सभात्याग केल्यानंतर विरोधक दिवसभर कामकाजात सहभागी झाले नाहीत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई आणि विधानसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलेल्या जोडे मारो आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही त्यावर चकार शब्द बोलू दिले नसल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठाण मांडत …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा इशारा, जोडे जसे तुमच्याकडे तसेच आमच्याकडेही, विसरू नका तुमच्या काळात नव्या पायंड्याला सुरुवात करताय म्हणत विरोधकांचा सभात्याग

विधानसभेच्या नियमित कामकाजाला सुरुवात होताच विधिमंडळ परिसरात आमदारांसाठी असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन कऱणारे कृत्य राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोडे मारो आंदोलन केले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधान परिषदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची आठवण महाविकास आघाडीच्या सदस्यांनी करून दिली. त्यानंतरही …

Read More »

अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही मराठवाड्यावर अन्यायच, दिलेला शब्द पाळलाच नाही मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी ठराव आता पुढील अधिवेशनात

विधिमंडळाच्या परिसरात आमदारांच्या वर्तणूकीबाबत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोडे मारो आंदोलन केले. याप्रकरणी विधिमंडळाच्या आचारसंहितेचा भंग होत असल्याने विरोधक महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्या सत्ताधारी आमदारांवर अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी कारवाई करावी अशी मागणी करत काँग्रेस नेते …

Read More »

राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द प्रकरणी जयंत पाटील म्हणाले, लोकशाहीच्यादृष्टीने अत्यंत… देशात विरोधकांना वेगवेगळ्या मार्गाने चिरडण्याची पध्दत सुरू झाली

सुरत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आज अचानकपणे इतक्या तातडीने देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याची अशी तडकाफडकी खासदारकी रद्द करण्याचा प्रसंग लोकशाहीदृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, या देशात विरोधकांना वेगवेगळ्या मार्गाने चिरडण्याची पध्दत सुरू …

Read More »

अजित पवारांचा हल्लाबोल, विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल सत्ता टिकवण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु

नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे, महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे, राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत, दिवसा-ढवळ्या तलवारी, कोयते नाचवले जात आहेत, गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत, राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याची स्थिती आहे. राज्यात डबल …

Read More »

अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा, उद्या विरोधी पक्षाकडून देखील घडेल… ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीय... ही महाराष्ट्राची परंपरा नाहीय विधिमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये

विधिमंडळाच्या आवारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीय… ही महाराष्ट्राची परंपरा नाहीय असे सांगतानाच रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा – त्याचा प्रश्न असतो, परंतु विधिमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार …

Read More »

राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन, विरोधकांच्या आक्रमकतेनंतर अध्यक्षांनीच सत्ताधाऱ्यांना भरला दम राहुल गांधी विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे कामकाज दोनवेळा स्थगित

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना आज सकाळीच २०१९ साली निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी पक्षातील भाजपा-शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमा होत लंडनमधील सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यप्रकरणी जोडे मारो आंदोलन सुरु केले. या घटनेचे …

Read More »

जयंत पाटील यांची भीती, एकेदिवशी… गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल एवढ्या गोष्टी या गुजरातकडे नेण्यात आल्या

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत त्याप्रमाणे एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय अशी भीती जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही याचे त्यांना दुःख आहे असा …

Read More »