Breaking News

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, घड्याळ चिन्ह आणि शरद पवारांचा फोटो का वापरता?

सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडत राज्यातील शरद पवार आणि अजित पवार अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने १४ मार्च रोजी खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि निवडणूक चिन्ह म्हणून मान्यता दिली आहे असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने आज अजित पवार गटाला करत शरद पवार यांचा फोटो आणि निवडणूक चिन्ह म्हणून घड्याळ का वापरत आहात असा थेट सवाल केला.

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात स्पष्ट करताना म्हणाले की, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी कोणतीही गोष्ट किंवा शरद पवार यांचे नाव फोटो. त्यांनी निवडलेले निवडणूक चिन्ह अजित पवार यांना वापरता येणार नाही. तसेच घड्याळ हे चिन्ह वापरून निवडणूक काळात संभ्रम निर्माण करू नये असे तोंडी आदेशही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुर्यकांत आणि के व्ही विश्वनाथन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने अजित पवार गटाला दिले.

यापूर्वी शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरल्या प्रकरणी शरद पवार यांनी अजित पवार गटाला न्यायालयात जाण्याचा गंभीर इशारा दिला होता. तरीही अजित पवार गटातील काही आमदार आणि मंत्र्यांनी शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरला होता. त्यावरून शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी वेळी अजित पवार गटाला आदेश दिले.

शरद पवार गटाकडून अभिषेक मनुसिंग सिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडताना मूळ पक्षातून बाहेर पडलेल्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह वापरण्यात येत आहे. तसेच पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे नाव आणि फोटोही वापरत शरद पवार यांच्याशी संबधितच हा पक्ष असल्याचा आरोप फुटीर गटाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात फुटीर गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचे नाव आणि फोटो ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरा असे वक्तव्य केल्याचा दाखला पुराव्या दाखल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.

त्यावर शरद पवार यांचे नाव आणि फोटो का वापरता, जर तुम्ही इतकाच जर विश्वास असेल तर तुमचा फोटो का वापरत नाही असा सवाल न्यायाधीश सुर्यकांत यांनी अजित पवार गटाचे मनिंदर सिंग यांना केला. त्यावर वकील मनिंदर सिंग म्हणाले की, पक्षाच्या वतीने असे कृत्य घडले नाही तर काही वात्रट पक्षाच्या सदस्यांनी असे विधान केल्याचे दिसून येत आहे. तसेच समाजमाध्यमांवर आणि कार्यकर्त्यांवर कोणत्याही पध्दतीचे नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर न्यायाधीश सुर्यकांत म्हणाले की, पक्षाने कार्यकर्त्यांना शिस्त लावावी असे निर्देश देत पुढे म्हणाले, मग याला जबाबदार कोण? तुम्ही तसे लिहून द्या की सर्व कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा फोटो वापरण्यापासून रोखणार म्हणून. सध्या परिस्थितीत तुम्ही दोघेही आता वेगवेगळे आहात मग तुम्ही तुमची ओळख वापरून पुढे जा आणि या गोष्टी रोखा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना रोखा असे स्पष्ट शब्दात अजित पवार गटाला सुनावत तुम्ही तसे लिहून द्या की शरद पवार यांचा फोटो वापरण्यापासून कार्यकर्त्यांना रोखू आणि शरद पवार यांचे नाव वापरणार नाही.

त्यावर मनिंदर सिंग यांनी अजित पवार गटाच्यावतीने सांगितले की, असे लिहून देण्यास आमची सहमती आहे.

तसेच शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंग सिंघवी यांनी अजित पवार गटाकडून वापरण्यात येत असलेल्या घड्याळ चिन्हाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आपल्या निकालात नमूद केलेले नसतानाही घड्याळ चिन्हाचा वापर निवडणूक चिन्ह म्हणून करण्यात येत आहे. तसेच घड्याळ हे अधिकृत चिन्ह म्हणून दिलेले नाही. त्यामुळे अजित पवार गटाने दुसरे चिन्ह निवडायला हवे असे निदर्शनास आणून दिले.

त्यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, ऐन निवडणूकीच्या धामधुमित मध्येच आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय बाजूला ठेवला तर काय होईल असे सवाल उपस्थित करत अजित पवार गटाने घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह निवडावे आणि तणाव विरहीत राजकारण करावे तसेच तेच चिन्ह निवडणूकीच्या कालावधीत वापरावे असा शहाजोगपणाचा सल्ला अजित पवार गटाला दिला.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *