Breaking News

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पाहिली तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले. तर तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

लातूर – ५५.३८ टक्के

सांगली – ५२.५६ टक्के

बारामती – ४५.६८ टक्के

हातकणंगले – ६२.१८ टक्के

कोल्हापूर – ६३.७१ टक्के

माढा – ५०.०० टक्के

उस्मानाबाद – ५२.७८ टक्के

रायगड – ५०.३१ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के

सातारा – ५४.११ टक्के

सोलापूर – ४९.१७ टक्के

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *