Breaking News

बारामतीत मतदानाच्या दिवशीच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, तर सोलापूरात तणाव

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या दृष्टीने उत्सुकता निर्माण झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीकडे सर्वाचे लक्ष्य लागून राहिलेले आहे. त्यातच आज सकाळपासून ११ लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र वास्तविक पाहता काल रात्रीपासूनच सुप्रिया सुळे समर्थक कार्यकर्त्यांनी आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर आज सातत्याने आरोप करत पैसे वाटपाचे तर कुठे माजी मंत्री दत्तात्रय भरणे हे एका कार्यकर्त्याला शिवी घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करत अजित पवार समर्थकांवर आरोप केला. तर दुसऱ्याबाजूला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार राम सातपुते यांनी सिध्देश्वर पेठेतील एका मतदान केंद्रावर काही जणांवर हरकत घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर हातकणगंले येथे सत्यजीत पाटील आणि धैर्यशील माने या उमेदवारांचे कार्यकर्त्ये समारोसमोर आल्याने दोन्ही समर्थकांमध्ये हाणामारीचा प्रसंग निर्माण झाला.

वास्तविक पाहता लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी राहिल्याने या कमी टक्केवारीचा नफा-तोटा नेमका कोणाला होणार यावरून सध्या काँग्रेस आणि भाजपाप्रणित आघाडी कडून विविध दावे केले जात आहेत. त्यातच आज महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघासह देशातील विविध राज्यातील ९४ जागांकरीता आज मतदान होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीकडून भाजपाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांवर आणि त्यांच्या नेत्यावर एकमेकांकडून लक्ष ठेवण्यात येत होते. यापार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपाच्या पाठिब्याने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र काल रात्रीपासून अजित पवार यांच्या समर्थकांकडून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना मतांसाठी प्रति व्यक्ती मतासाठी पैशाचे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करत त्या विषयीचा एक व्हिडिओ शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी प्रसिध्द करत अजित पवार यांच्यावर आरोप केले. त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार दत्तामामा भरणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना नीट काम करत नसल्यावरून चक्क शिवराळ भाषेतून शिवीगाळ करत दमदाटी करत असल्याचा व्हिडिओही रोहित पवार यांनी व्हायरल करत अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांवर आरोप केले.

तर सोलापूरात सिद्धेश्वर पेठेतील एका मतदान केंद्रावर मतदार रांगेत मतदात्यासोबतच इतरकी काहीजण उभे होते. नेमक्या त्याच कालावधीत भाजपा उमेदवार राम सातपुते हे तेथील मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आले. त्यावेळी मतदार सोडून भलत्याच लोकांनी गर्दी केल्याने स्वतः राम सातपुते यांनी अशा अनावश्यक गर्दी करून राहिलेल्या नागरिकांवर आक्षेप घेतला. त्यामुळे या भागात काही काळ राम सातपुते विरूध्द स्थानिक नागरिक यांच्यात हमरी-तुमरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही काळ या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.

तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धैर्यशील माने हे पुन्हा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना उबाठा गटाकडून सत्यजीत पाटील हे ही याच मतदारसंघातून उभे आहेत. मात्र आज मतदानाच्या दिवशी सत्यजीत पाटील समर्थक आणि धैर्यशील माने यांचे कार्यकर्त्ये काही भागात समोरासमोर आले त्यानंतर या दोन्ही समर्थक गटातील कार्यकर्त्यांकडून बाचाबाची झाली. मात्र उपस्थित स्थानिक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून वेगळे केले. त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला.

यात माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला येथे काही एका मतदान केंद्रावर चक्क मतदात्यानेच ईव्हिएम मशिन्सला आग लावली. त्यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांन ईव्हिएम मशिन्सला लावण्यात आलेली आग यशस्वीरित्या विझवली. तसेच आग लावणाऱ्या मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, पत्नी, मुलगी आदींना त्या त्या पक्षाच्या नेत्याकडून उमेदवारी दिल्याने संबधित उमेदवारांच्या पतींनी त्यांच्या पत्नीची उमेदवारीचा मतदारसंघ प्रतिष्ठेची केली. यात सर्वाधिक चर्चेत असलेली बारामती लोकसभा मतदारसंघ आणि दुसरी म्हणून विद्यमान भाजपा आमदार राणा जगजीत सिंग पाटील आणि त्यांच्या पत्नींला अजित पवार गटाचे तिकिट मिळाले असल्याने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *