Breaking News

राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाचे एकच मुख्य कार्यालय ?

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मंत्रालयासमोर आपले कार्यालय थाटले असले तरी या कार्यालयाला संपर्क कार्यालय असे नाव दिले असून राष्ट्रवादीचे मुख्य कार्यालय म्हणून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बॅलार्ड पियर येथील कार्यालयाचाच पत्ता दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत .

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले त्यांना मंत्रालयासमोरील अ -५ प्रतापगड या बंगल्याचा ताबा देण्यात आला अजित पवार यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे थाटामाटात उदघाटन संपन्न झाले . आता याच कार्यालयात बसून या गटाचे अध्यक्ष अजित पवार ,प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे व प्रवक्ते, पक्षाचा कारभार हाकत असताना देखील त्यांच्या लेटरहेडवर मात्र मुख्य कार्यालय म्हणून बॅलार्ड ईस्टेट , ठाकरसी इस्टेट फोर्ट मुंबई असा उल्लेख करण्यात आलेला आहे .

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांनी प्रसिद्धीमाध्यमासाठी आज १४ प्रवक्त्यांच्या यादीचे पात्र जाहीर केले या पात्रात त्यांनी मुख्य कार्यालय म्हणून उरत येयहील कार्यालयाचा पत्ता नमूद केला आहे . राष्ट्रवादी पक्ष आणि आमदार अपात्रतेची सध्या सुनावणी सुरु असतानादेखील अजित पवार गटाने आपले मुख्य कार्यालय म्हणून शरद पवार गटाच्या कार्यालयाचा पत्ता कायम ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे .

माध्यमांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या १४ प्रवक्त्यांची यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका भूमिका माध्यमांमध्ये मांडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज १४ प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, संजय तटकरे, मुकेश गांधी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, रुपालीताई ठोंबरे, प्रशांत पवार, मुजीब रुमाणे, ताराचंद म्हस्के -पाटील, सायली दळवी आदींचा समावेश आहे.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *