Breaking News

Tag Archives: jayant patil

‘आयत्या बिळावर नागोबा’ चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची मापं काढणे बंद करावे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा

सांगलीः प्रतिनिधी ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रिय केला त्यावर ‘आयत्या बिळावर नागोबा’ सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला. सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी शरद पवारच्यांवर चुकीचं विधान करणार्‍या चंद्रकांत पाटील …

Read More »

मंत्री जयंत पाटील यांचा असाही लाँग ड्राईव्ह आणि चर्चा मध्यरात्री स्वतःच स्टिअरिंग हातात घेत केला प्रवास

यवतमाळ : प्रतिनिधी राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यात दिवसभर पक्षाचा आढावा… सभा, बैठका आणि पुन्हा प्रवासात पदाधिकारी, जनतेशी गाठीभेटी असा दिनक्रम असताना सोबत असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांशी बोलता यावं… त्यांना मार्गदर्शन करता यावं…म्हणून चक्क प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यरात्री स्वतः गाडीचे स्टेअरिंग हातात घेऊन युवा पदाधिकाऱ्यांशी दोन तास चर्चा केली… प्रदेशाध्यक्ष जयंत …

Read More »

पवारांचा सवाल, देशाच्या पंतप्रधानांनी आंदोलक शेतकऱ्यांची चौकशी केली का ? संयुक्त शेतकरी मोर्चात मोदींना पवारांचा खडा सवाल

मुंबईः विशेष प्रतिनिधी देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीच्या सीमेवर थंडी, वाऱ्याची पर्वा न करता केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेले ६० दिवस आंदोलन करत आहेत. परंतु देशाच्या पंतप्रधानांनी या शेतकऱ्यांची साधी चौकशी तरी केली का असा सवाल करत केंद्र सरकाला कणव नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, पक्षभेद विसरा- विकास कामासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा सर्वपक्षिय खासदारांच्या बैठकीत आवाहन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करतानाच खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्याचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वाधिक ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नाही- जयंत पाटील

मुंबईः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. १३ हजार २९५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये ३ हजार २७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विजयी झाली आहे. तर काँग्रेस – …

Read More »

पाच तासाच्या बैठकीनंतर मुंडेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला हा निर्णय तुर्तास मंत्रिपदाचा राजीनामा नाही

मुंबईः विशेष प्रतिनिधी एका महिलेनी केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले. त्यामुळे मंत्रिमंडळातून मुंडे यांची गच्छंती अटळ मानली जात असतानाच त्यांना अभयदान मिळाले आहे. मुंडे यांच्यावरील आणि त्यांनी कथित महिलेने केलेल्या आरोपातील अनेक गोष्टींची कबुली दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्य मंत्रिमंडळाच्या प्रतिमेवर …

Read More »

लोकसहभागासाठी मंत्री जयंत पाटलांचा आगळावेगळा इस्लामपूर पॅटर्न बुथ कमिट्यांच्या बैठकांसाठी घरोघरी पत्र पाठवून देतात आमंत्रण

सांगली : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील यांचा आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीसाठी नावलौकीक आहे. असाच एक नावलौकिक मिळवलेला त्यांचा आगळावेगळा ‘इस्लामपूर पॅटर्न’ आता नव्याने समोर आला आहे. लोकसहभागाचा दृष्टिकोन राखून इस्लामपूर मतदारसंघातील बुथ कमिट्यांच्या बैठकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयातून घरोघरी आमंत्रण पत्र पाठवले जात आहे. आपला …

Read More »

भाजप, रासपाच्या कार्यकर्त्याबरोबर भिवंडीतील या नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला सोहळा

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने दौंड येथील तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, …

Read More »

पवारांच्या वाढदिनामिमित्त राज्यातल्या दिव्यांग आणि स्पर्धा परिक्षार्थींसाठी दोन नवे अॅप नव्या अॅपच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातल्या प्रत्येक दिव्यांगाना देणगीदारांच्या माध्यमातून आवश्यक असलेली मदत मिळावी यासाठी महाशरद (mahasharad), स्पर्धा परिक्षार्थीं व अनुसूचित जातींसाठीच्या असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बार्टी (Barti) असे दोन मोबाईल अॅण्ड्राईड अॅप लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. हे दोन्ही अॅप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या …

Read More »

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादजवळील पैठण येथील संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी लोकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना तर मागवाच  तसेच जागतिक स्तरावरील  सल्लागार देखील नियुक्त करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले. वर्षा येथील समिती सभागृहात यासंदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.जलसंपदा …

Read More »