Breaking News

सुप्रिया सुळे यांनी तो व्हिडिओ ट्विट करत म्हणाल्या, महाराष्ट्र बंद नव्हे तर उघड्या डोळ्यांनी बघतोय…. नशिब आंदोलनकांवर अद्याप अर्बन नक्षलवादाचा ठपका....

बारसूतील रिफायनरी प्रकल्पाचा विरोध वाढत जात आहे. सरकारने जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही तेथील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हणाल्या की, कोकणातील बारसू रिफायनरीच्या विरोधात तेथील स्थानिक नागरीकांनी आंदोलनाची भूमिका घेतली असताना त्यांच्यावर राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करीत आहे. पोलीसांच्या लाठीमारात काही आंदोलक जखमी झाल्याचे समजते. शासनाने बळाचा वापर करण्यापेक्षा स्थानिक नागरीक व इतर घटकांशी चर्चा करुन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. स्थानिकांवर कोणताही प्रकल्प बळजबरीने लादण्याचा प्रयत्न करु नये. स्थानिकांचे म्हणणे विचारात न घेणे हे योग्य नाही. याबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांनी एकत्र बसून तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, जो काय प्रकार सुरू आहे. तो महाराष्ट्र बंद नव्हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. ही दादागिरी महाराष्ट्र सहन करणार नाही. कारण आज बारसूतील ग्रामस्थांवर जी वेळ आली आहे, ती उद्या आपल्यावरही येणार आहे. या आंदोलनात सत्यजित चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलकांचे नशिब की त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाचा ठपका ठेऊन त्यांच्यावर अद्याप देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारला लगावला.

जास्त दांडगाई जनता सहन करत नाही, हेच या सत्ताधाऱ्यांना समजत नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

 

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *