Breaking News

आदित्य ठाकरे यांचा आरोप, आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडून ऑफर… सत्ता आल्यानंतर त्यांच्यावर बुलडोझर चालविणार

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘धडक मोर्चा’चं आज ( १ जुलै ) आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकार आणि पालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला. यावेळी सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आमचं सरकार आल्यानंतर मुंबईतील लुटारूंना जेलमध्ये टाकणार, असा इशारा देत ते पुढे म्हणाले, आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात येण्यासाठी ऑफर देत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिकेची एसआयटी चौकशी सुरु केली आहे. त्याप्रमाणे पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिकची सुद्धा करा. याबाबत राज्यपालांना आम्ही विनंती केली असल्याचेही सांगितले. .

तसेच नगरसेवकांना येत असलेल्या ऑफरवरून आदित्य ठाकरे म्हणाले की, मला नगरसेवकांनी म्हटलं, एक-दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा फोन येतो. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ऑफर दिली आहे, असं अधिकारी सांगतात. त्याचं रेकॉर्डिंग हाती आलं आहे. दाखवायचे तिथे दाखवणार असल्याचा सूचक इशाराही दिला.

तसेच आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, पाच रस्ते कंत्राटदारांना पाच पाकिटे देण्यात आली. पण, मी रस्त्यांचा विषय हाती घेतल्यावर जूनपर्यंत ४०० किलोमीटर नाहीतर, फक्त ५० रस्ते करू सांगितलं. यांना ५० शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. जानेवारीतील काम एप्रिल, मे मध्ये सुद्धा सुरु केलं नाही. मग कोणते रस्ते तुम्ही पूर्ण करणार आहात?, असा सवाल करत ते पुढे म्हणाले, ५० रस्ते पूर्ण करू शकणार नाही, हे बोलल्यावर भाजपा, मिंधे गट आणि खोके सरकारने माझ्यावर टीका केली. तुम्ही मला पप्पू बोलताय ना… तुम्हाला पप्पू आव्हान देतोय, या अंगावर… एकटे या किंवा पूर्ण फौज घेऊन या. माझ्या छातीवर वार करण्यासाठी या… माझी तयारी आहे, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाला दिले.

तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्याच्या कोणाच्या सांगण्यावरून बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा मारलात त्यांच्यावर आमचं सरकार आल्यानंतर बुलडोजर चालविणार असल्याचा इशारा त्यांना तुरूंगातही टाकणार असल्याचे सांगितले.

Check Also

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत जखमींवर मोफत उपचार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *