Breaking News

हवामान

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कुलाबा वेध शाळेने व्यक्त केला अंदाज

जवळपास जूनचा अर्धा महिना गेला तरी मान्सूनने मुंबईसह राज्यातील अनेक भागात मान्सूनने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे यंदा मान्सून महाराष्ट्रावर नाराज होवून तसाच जाणार की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता मागील दोन –तीन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सून आपली हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही …

Read More »

राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी केली केंद्राकडे ‘ही’ मागणी अतिरक्त दोन इको बटालियनची केंद्राकडे मागणी

राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या सहकार्यातून वृक्षलागवड करून हरित क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न करण्याच्यादृष्टीने औरंगाबाद येथील पहिल्या इको बटालियन कंपनीस आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी …

Read More »

राज्यात या नवीन ठिकाणांचा संवर्धन, अभयारण्ये आणि जैविविधता स्थळांचा समावेश पर्यावरणस्नेही विकासाचा आग्रह कायम- मुख्यमंत्री

राज्यात मागील अडीच वर्षात १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव, ६४७.१२९४ चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्ये आणि ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे. शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य …

Read More »

हवामानात कोणताही बदल नाही पण “या” ठिकाणी मान्सूनची हजेरी हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

मागील काही दिवसांपासून कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला होता. मात्र आता नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. तर काही भागात फक्त ढग जमा झाले आहेत. पण अद्याप मराठवाड्यात मान्सून …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचा निर्णय; राज्यातील नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान

वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने …

Read More »

उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस आणखी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे. जम्मू ते विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असताना पूर्वोत्तर भागातील राज्ये आणि दक्षिणेकडील भागात सध्या मोसमी पाऊस पावसाने जोर धरला आहे. उत्तर भारतासह विदर्भातील उष्णतेच्या लाटेची स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त …

Read More »

प्रदूषण रोखूया.. चला ‘ईव्ही’ वापरूया वातावरणीय बदल आणि पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर खास लेख

वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामधील ए‍क म्हणजे राज्याचे इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) धोरण. राज्य शासनाने या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. चला आपणही ईव्ही वापरून या प्रयत्नांना हातभार लावूया… वातावरणीय बदलांचे गंभीर परिणाम आता जगभरातील नागरिक अनुभवत आहेत. उष्णतेमधील वाढ, वारंवार येणारी चक्रीवादळे, अतिवृष्टी …

Read More »

स्कायमेट म्हणते, भारतीय हवामान खात्याची “ती” माहिती चुकीची केरळात मान्सून दाखल नाहीच

वाढत्या उन्हाच्या काहिलीने संपूर्ण भारतीय त्रस्थ झालेले असताना कधी एकदा मान्सूनचे आगमन होते आणि वातावरणात बदल होवून दिलासा मिळतो याची वाट पहात असताना नुकतेच भारतीय हवामान खात्याने केरळात मान्सून दाखल झाल्याचे जाहिर केले. मात्र भारतीय हवामान खात्याने जाहिर केलेली माहिती चुकीची असल्याचा दावा स्कायमेट या खाजगी हवामान कंपनीने केली. त्यामुळे …

Read More »

हवामान खात्याने दिली आनंदाची बातमी; केरळात तीन दिवस आधीच मान्सून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची धीमी वाटचाल

मागील काही दिवसांपासून वाढत्या उन्हाच्या काहीलीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे कधी होते मान्सूनच्या पावसाचे आगमन याची उत्सकुता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागल्याने किमान काही काळ तरी हवेत गारवा निर्माण होतो. परंतु यंदा मान्सून पूर्व पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे सुर्याच्या उष्ण किरणांनी चांगलीच …

Read More »