Breaking News

हवामान

जागतिक दर्जाचा इको पार्क उभारणार निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज वन विभागाचे प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फ्रीज, एसी सारख्या उपकरणाचा वापर कमी… जागतिक ओझोन दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र शासन आपले संपूर्ण योगदान देत आहे. फ्रीज, एसीसारख्या उपकरणांचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे अशा विविध पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण …

Read More »

मुनगंटीवार यांची घोषणा, बॉटनिकल गार्डनला वाजपेजींचे नाव अन ताडोब्यात नवी सफारी विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी

चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी २५ डिसेंबरला करण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक नियोजन करावे असे निर्देश वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर जिल्‍हयातील अपूर्ण असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करावे यासंदर्भात असलेल्‍या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूरात घेतलेल्‍या आढावा बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी …

Read More »

हवामान विभागाचा इशाराः पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हा प्रशासनांना सावधगिरीच्या सूचना

पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. …

Read More »

पूरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात

नागपूर विभागामध्ये गेल्या २४ तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीकरीता बंद करण्यात आले आहेत. या भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरु आहे. राज्यात अन्यत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय …

Read More »

“या” जिल्ह्यांना पुढील ४ ते ५ दिवस रेड आणि यलो अलर्ट मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश

मागील दोन आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनने चांगलीच हजेरी लावत सातत्याने पाऊस कोसळत आहे. परंतु मागील दोन दिवस पावसाने उघडीप दिली असे वाटत असतानाच आगामी ४ ते ५ दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के.एस.होसळीकर यांनी ट्विट करत …

Read More »

गोदावरी, प्राणहीता पाणलोट क्षेत्रात नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

सततच्या पावसामुळे गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २० मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी …

Read More »

ठाणे जिल्ह्यात दुपटीने पाऊस, मुंबईचा पाणीप्रश्न सुटला तानसा आणि मोडक सागर धरणांच्या पाणी पातळीत वाढ

मागील दोन आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने चांगलीच हजरी लावली. तसेच या दोन आटवड्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडल्याचे नोंद झाली आहे.  जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात ही सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ६८५.३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात …

Read More »

पुणे, नाशिक, कोकणला पुढील ४८ तासाचा इशारा; वाचा जिल्हानिहाय पाऊस स्थिती भारतीय हवामान खात्याकडून इशारा जारी

सबंध जून महिना नाराज असलेल्या पावसाने जुलै महिना उजाडताच आपली हजेरी लावण्यास सुरुवात केलेली असून त्यात अद्याप खंड पडू दिला नाही. मागील आठवड्यापासून सक्रिय मान्सूनने कोकण, पुणे, मुंबईला पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असतानाच विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने हजेरी लावत जून महिन्यातील तुटीचा कालावधी …

Read More »

राज्यात पावसामुळे ७६ जणांचा मृत्यू तर ८३८ घरांचे नुकसान तर मागील २४ तासात ८ जणांचा मृत्यू

मुंबईसह कोकणात पावसाला तशी उशीराने सुरुवात झालेली असली तरी १ जूनपासून राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावत कधी संततधार तर कधी अतिवृष्टीमुळे अनेक वेळा स्थानिक पातळीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यत राज्यात विविध ठिकाणी १ जून ते आतापर्यत पावसामुळे …

Read More »