Breaking News

भाजपाची कमाई तोबा वाढली, वर्षात १३०० कोटी रूपये

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील १० वर्षाच्या काळात भलेही महागाई, बेरोजगारी आणि देशातील सामाजिक स्थैर्य धोक्यात येत धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढीस लागल्याचा आरोप सातत्याने काँग्रेससह विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर २०२२-२३ या एका वर्षात भाजपाला जवळपास १३०० कोटी रूपयांचा निधी इलेक्ट्रॉल बॉण्डमधून मिळाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

भाजपाला मिळालेल्या निवडणूकी निधीचा आकडा पाहिला तर आतापर्यंत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या निधीपेक्षा ७ पट अधिकचा निधी भाजपाला मिळाला असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे भारतातील सर्वाधिक श्रीमंत पक्ष म्हणून भाजपा ठरला आहे. आजस्थितीला भाजपाला २१२० कोटी रूपयांचा निधी जमा झाला असून यातील ६१ टक्के निधी हा इलेक्ट्रॉल निधीतून मिळालेला आहे.

२०२१-२२ या वर्षी भाजपाला १७७५ कोटींचा निधी मिळाला होता. तर २०२२-२३ मिळालेला निधी २३६० कोटी रूपयांचा निधी भाजपाने मिळविला. तर २०२१-२२ या वर्षी भाजपाला मिळणाऱ्या निधीतून भाजपाच्या बँक खात्यात १९१७ कोटींचा टप्पा पार केला होता.

तर काँग्रेसला इलेक्ट्रॉल निधीतून २०२२-२३ साली फक्त १७१ कोटी रूपयांचा निधी मिळाला. तर गतवर्षी काँग्रेसला इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून २३६ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काँग्रेसला मिळालेला निधी कमी असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सध्या देशाच्या राजकारणा काँग्रेस आणि भाजपा या दोनच राजकिय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखले जाते. मात्र या दोन्ही पक्षांकडे जमा झालेल्या निधीचा विचार केला तर काँग्रेसला मिळालेला निधी फारच कमी असल्याचे दिसून येत आहे.

उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टी ही प्रादेशिक पक्ष म्हणून ओळख असून २०२१-२२ साली इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून ३.५ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. परंतु यंदाच्यावर्षी आतापर्यंत इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून काहीच निधी मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

तर आंध्र प्रदेशातील तेलगु देसम पक्षाला यंदाच्या वर्षी ३४ कोटींचा निधी मिळाला आहे. यापूर्वीचा मिळालेला निधी पाहता आतापर्यंतच्या १० पटीत हा निधीत यंदाच्यावर्षी मिळाल्याचे दिसून येत आहे.

तर भाजपाला बँक ठेवीतून मिळालेल्या रकमेवरील व्याज २३७ कोटी रूपये २०२२-२३ या वर्षाच्या अखेरीस मिळालेले आहेत. २०२१-२२ साली भाजपाला १३५ कोटी रूपये बँकेकडून व्याजापोटी मिळालेले आहेत. यातील ७८.२ कोटी रूपयांचा निधी हेलिकॉप्टर आणि विमानमार्गे निवडणूकीच्या प्रचारासाठी खर्च केले. तर यापूर्वी भाजपाकडून ११७.४ कोटी रूपयांचा खर्च गतवर्षीच्या तुलनेत करण्यात आला होता. त्या तुलनेत २०२२-२३ या वर्षात करण्यात आलेला खर्च कमी असल्याचे दाखविण्यात आला आहे. तर भाजपाच्या उमेदवारांना आर्थिक रसद पोहोचविण्यासाठी किंवा मदत करण्याच्या उद्देशाने २०२१-२२ साली १४६.४ कोटी रूपये खर्च केले होते. मात्र यंदाच्या २०२२-२३ साली अवघे ७६.५ कोटी खर्च केल्याची माहिती द हिंदू या इंग्रजी प्रसारमाध्यमाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Check Also

नाना पटोले यांची मागणी, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यातील चर्चा जाहीर करा

मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *