Breaking News

नामांतराच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, सध्या प्रश्न कुठले महत्त्वाचे… भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या मागणीवर अजित पवारांचे प्रत्युत्तर

आजच महाराष्ट्रात नामांतर होते आहे का? राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. औरंगाबादचे नामकरण असेल किंवा उस्मानाबाद याच्याही नामांतराचा प्रश्न सुरु आहे. लोकशाहीत सर्वांना मागणी करण्याचा अधिकार आहे. या जशा मागण्या करणार्‍याला महत्त्वाच्या वाटतात. त्या सगळ्या वंदनीय, महनीय व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु सध्या प्रश्न कुठले महत्त्वाचे आहे असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत

परंतु इतरही महत्त्वाचे त्यालाही महत्त्व दिले गेले पाहिजे. मध्यंतरी बघितले की महंत चर्चेला बसले आणि एकमेकांना माईक उचलून मारण्याचा प्रयत्न केला. त्याचे प्रात्यक्षिक भुजबळसाहेबांनी दाखवले मी ते दाखवणार नाही. परंतु याच्यातून आपण काय मिळवणार आहे आणि लोकांना काय मेसेज देणार आहोत याचा विचार सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी करायला हवा असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

कुणी काय आरोप करावा, कुणी काय पत्र द्यावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. नेहमीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे मान्यवर जात असतात अभिवादन करुन दर्शन घेत असतात. आजही नाही तर मागच्या काळात फडणवीस सरकारच्या काळात कार्यक्रम होत होते. आता पवारसाहेब जाऊन आले. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, रोहित पवार गेले याठिकाणी कुणीही जात- येत असतात, त्यामुळे इथे राजकारणाचा संबंध येतो कुठे असा सवालही त्यांनी यावेळी केला.

भाजपाचे दोन, दोन्ही कॉग्रेसचे दोन आणि सेनेचा एक असे पाच सदस्य राज्यसभेवर निवडून येणारच आहे. आता सहावा उमेदवार सेनेने दिला आहे. आमची मतेही शिवसेनेलाच देणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेच्या निवडणूकीत मते दाखवून मतदान केले जाते. त्यामुळे घोडेबाजार होणार नाही. राहिला प्रश्न अपक्ष मतदान दाखवत नाही. त्यामुळे ही चर्चा सुरू आहे. कमी पडणारी मते सेना आणि भाजपला लागणार आहेत. काही अपक्ष सेनेशी संलग्न आहेत तर काही आमच्याकडे आहेत. काही भाजपाकडेही आहेत. त्यामुळे घोडेबाजारच्या अशा चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प पूर्णत्वास गेले पाहिजे हे माझे वैयक्तिक मत आहे असे स्पष्ट करतानाच मात्र अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री घेतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या ओबीसींचा प्रश्न आहे. त्यांना प्रतिनिधीत्व मिळायला हवे. जातनिहाय जनगणना ही चर्चा होते आहे. देशामध्ये नेमक्या किती जाती आहेत हे कळू द्या. म्हणजे जातींचा हा विषय थांबेल. राज्याची साडेबारा कोटी लोकसंख्या आहे. मात्र जातींबाबत जी ओरड लोकं करतात त्यांच्या आकडेवारीनुसार बेरीज केली तर ४० कोटींच्यावर जाते. मात्र तेवढी संख्या नाही. त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाली तर किती जाती आहेत हे स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, गुजरातला परवानगी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले?

कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *