Breaking News

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात फक्त ८ टक्के महिलांना उमेदवारी

देशात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. देशांतर्गत एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. तर चालू महिनाभरात लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. देशातील लोकशाही प्रक्रियेत महिलांनाही पुरेसे प्रतिनिधित्व देण्याची भाषा सर्वच राजकिय पक्षांकडून बोलली जात आहे. मात्र लोकसभा निवडणूकीच्या या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये एकूण १,६१८ उमेदवारांपैकी फक्त ८% महिलांनी भाग घेतला होता, राजकीय कार्यकर्त्यांनी असे म्हटले आहे की ते लैंगिक पूर्वाग्रहाच्या गहन समस्येचे प्रतिबिंबित करते आणि त्यांना सशक्त करण्याची चर्चा पोकळ असल्याची माहिती द हिंदूच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १३५ महिला उमेदवार होत्या तर दुसऱ्या टप्प्यात १०० महिला उमेदवार होत्या, पहिल्या दोन टप्प्यांसाठी एकत्रितपणे २३५ महिला उमेदवार होत्या. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील १३५ महिला उमेदवारांपैकी, तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ७६ उमेदवारांचा वाटा होता, परंतु राज्यातील उमेदवारांपैकी त्यांचा वाटा फक्त ८% आहे, तर केरळमध्ये ४ टप्प्यात सर्वाधिक महिला उमेदवार आहेत.

पक्षनिहाय, काँग्रेसने आतापर्यंत ४४ महिलांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने पहिल्या दोन टप्प्यात ६९ महिलांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रीय आणि सामाजिकस्तरावराच्या दृष्टीकोनातून या महत्त्वपूर्ण लैंगिक महिलांच्या सहभागातील असमतोलामुळे राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांकडून टीका होत आहे. जे विचारतात की पक्ष महिलांना सक्रियपणे तिकीट देण्याऐवजी महिला आरक्षण विधेयक लागू होण्याची वाट का पाहत आहेत, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *