Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

संभाजी राजेंच्या उमेदवारी प्रश्नी श्रीमंत शाहु महाराज म्हणाले, त्यांचे कुठे छापून आले नाही काय सल्ला हे माहित नाही पण ते वक्तव्य चुकीचे

राज्यसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. त्यातच आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेचे प्रकक्ते संजय राऊत यांनीही भाजपावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे …

Read More »

नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? हा शनी… महिन्यानंतर महाराष्ट्रात परतल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

काही दिवसांपूर्वी हनुमान चालिसा प्रकरणी तुरूंगात १४ दिवस घालविल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा हे काही दिवस मुंबईत थांबून पुन्हा नवी दिल्लीला गेले होते. तेथे जवळपास काही दिवस राहिल्यानंतर तब्बल ३६ दिवसानंतर पुन्हा नागपूरात परतल्यानंतर राणा दाम्पत्याने येथील शनीच्या मंदिरात जावून पुजा-अर्जा केली. तसेच हनुमान चालिसाचे पठणही केले. …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या “त्या” आवाहनानंतर मंत्री अस्लम शेख यांचा निर्बंधाबाबत मोठा इशारा पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता वर्तविली

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर नियमात शिथिलता आणत निर्बंधमुक्त केले. त्यास आता जवळपास दोन-तीन महिन्याचा कालावधी लोटला असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरीकांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले. आता त्यापाठोपाठ मुंबईचे पालकमंत्री तथा …

Read More »

आमदारांची नाराजी रोखण्यासाठी महिनाभर सरकारी बदल्यांना स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

राज्यात पहिल्यादाच राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. या दोन्ही निवडणूकांसाठी सर्व पक्षिय आमदार मतदान करणार आहेत. मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी आमदार आणि मंत्र्यांकडून शिफारसी करण्यात येतात. परंतु शिफारसी करूनही आमदार आणि मंत्र्यांना आपल्या आवडीच्या अधिकाऱ्याची बदली न झाल्यास त्यावरून आमदार आणि मंत्र्यांमध्ये नाराजी पसरू नये म्हणून …

Read More »

किरिट सोमय्या म्हणाले; परबांनी ती जागा विकली, पण उध्दव ठाकरेंना नोबेल पारितोषिक मिळेल ईडी कारवाईनंतर सोमय्यांची पुन्हा मुख्यमंत्री आणि अनिल परबांवर टीका

ईडीने काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी आणि खासजी निवासस्थानासह ७ ठिकाणी धाडी टाकत १२ तासाहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. तसेच चौकशीला आपण सामोरे जाणार असल्याचेही जाहिर केले. त्यानंतर आज भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी आज …

Read More »

संभाजी राजेंचा आरोप; मी गेलो पण, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही… राज्यसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याचे केले जाहिर

राज्यसभा निवडणूकीतील सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे यांनी प्रयत्न सुरु केले. तसेच अपक्ष उमेदवारी जाहिर करत शिवसेना आणि भाजपाने पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शिवसेनेनेत प्रवेश न केल्यामुळे शिवसेनेने संभाजी राजे यांच्या नावाचा पत्ता कट केला. यासर्व राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आवाहन, कोरोना वाढतोय, मास्क वापरा; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय सारथी संस्थेस खारघरमध्ये भुखंड उपलब्ध करुन देणार

कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी १.५९ टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर …

Read More »

शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर अखेर ईडीची धाड शासकिय निवासस्थानासह सात ठिकाणी टाकले छापे

anil [arab

जवळपास मागील एक वर्षापासून भाजपाचे किरीट सोमय्या हे शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई होणार होणार असल्याचे सातत्याने सांगत होते. त्यानुसार आज सकाळीच परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या अंजिक्यतारा बंगल्यासह सातवे ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्याचबरोबर दापोली रिसॉर्टसाठी पुण्यातील साठे नामक व्यक्तीकडून जमिन खरेदी केली …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान, तिहेरी चाचणी काय ते सांगा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाचा धडक मोर्चा

ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्याचा निर्धार करून भारतीय जनता पार्टीने बुधवारी मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अटक करून घेतली. महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. वाचा चंद्रकांत पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा नाना पटोले …

Read More »

तुम्हाला माहित आहे का? मंत्रालय आणि जिल्हा परिषदेत किती पदे रिक्त आहेत २ लाख ४४ हजार ४०५ पदे रिक्त सर्वाधिक पदे गृह विभागाची रिक्त

Mantralay

राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील विविध विभागात आणि जिल्हा पातळीवरील जिल्हा परिषदांमधील विभागात किती पदे रिक्त आहेत याची माहिती सर्वसाधारणपणे कधी पुढे येत नाही. मात्र यावेळी पहिल्यांदाच राज्यातील विविध विभागात आणि जिल्हा परिषदअंतर्गत २.४४ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात माहिती कायद्यातंर्गत शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील …

Read More »