Breaking News

संभाजी राजेंचा आरोप; मी गेलो पण, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही… राज्यसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याचे केले जाहिर

राज्यसभा निवडणूकीतील सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे यांनी प्रयत्न सुरु केले. तसेच अपक्ष उमेदवारी जाहिर करत शिवसेना आणि भाजपाने पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शिवसेनेनेत प्रवेश न केल्यामुळे शिवसेनेने संभाजी राजे यांच्या नावाचा पत्ता कट केला. यासर्व राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर दिलेला शब्द पाळला नसल्याचा गंभीर आरोप केला. मुंबई पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यसभेकरीता अपक्ष उमेदवार म्हणून लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर मला शिवसेनेकडून विचारणा झाली. सुरुवातीला आपणास शिवसेनेच्या एका खासदाराचा फोन आला. त्यानंतर शिवसेनेचे दोन खासदारांनी सांगितले की आपण शिवसेनेत प्रवेश करावा. मी त्यांना सांगितले की शिवसेनेत येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला मी चर्चेला गेलो. छत्रपतींना बाजूला ठेवायचे नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मला त्यांनी शिवसेनेत प्रवेश करा म्हणून सांगितले मी नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठविण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखविले. मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप संभाजी राजे यांनी केला.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्नेही भेटायला आले होते. त्यांनीही मला आज शिवसेनेत प्रवेश करा अशी इच्छा असल्याचे सांगितले. त्यास मी नकार दिला. दोन दिवसांमध्ये मला एका मंत्र्याचा फोन आला सुवर्ण मध्ये काढायचे आहे असे मला म्हणाले. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार मला करा असा मी प्रस्ताव ठेवला. शब्द मिळाला म्हणून कागदपत्र पूर्ण करायची होती म्हून मी कोल्हापूरला गेलो. मंत्र्यांच्यासोबत बैठक झाली आणि एक ड्राफ्ट तयार झाला. त्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. खासदार मंत्री यांना मी फोन केला. हा काय प्रकार सुरु असा सवाल करत मुख्यमंत्री यांनी शब्द पाळला नसल्याचे सांगत शिवसेनेत माझ्या जागी एकाला उमेदवारी केल्याचे त्यांनी सांगितले.

माझी स्पर्धा ही माझ्याशी आहे. मला कोणाचा द्वेष नाही. मी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोकळा झाला आहे. गोरगरीब लोकांच्या पाठिशी स्वराज्य संघटनेच्या माध्यमाने मी राहणार असल्याची घोषणा करत ज्या आमदरांनी स्वाक्षऱ्या दिल्या त्यांचा मी आभारी असल्याचे सांगत त्यांचा आयुष्यभर त्यांचा आभारी राहील असेही ते म्हणाले.

छत्रपती मावळे घडवतात मी ही छत्रपतींचा मावळा आहे. घोडेबाजार होवू नये यासाठी मी निवडणूकीला सामोरे जाणार नसल्याचे जाहिर करत पण मला माहित आहे की घोडेबाजार होणार असल्याचे ठाम प्रतिपादन करत मी स्वराज्यासाठी लढणार आहे. मी संजय राऊत यांच्याशी का बोलू असा सवाल करत मला बोलायचे तर मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलेन असे सांगत अनेक आमदारांचे मला फोन येत आहेत. कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी लढवायची म्हणून. पुढारी लोकांनी

माझ्या कामाचा आदर करायला नको का? असा सवाल करत राजकीय पक्षांनी त्यांचा राबवावा राजकिय पक्षांचा मला द्वेष नाही. सगळ्या अपक्ष आमदारांवर दबाव होता असा आरोपही त्यांनी करत कोरोनामुळे मागील वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा झाला नाही. ६ जूनला शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी रायगडावर मोठ्या संख्येने या असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *