Breaking News

नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? हा शनी… महिन्यानंतर महाराष्ट्रात परतल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

काही दिवसांपूर्वी हनुमान चालिसा प्रकरणी तुरूंगात १४ दिवस घालविल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा हे काही दिवस मुंबईत थांबून पुन्हा नवी दिल्लीला गेले होते. तेथे जवळपास काही दिवस राहिल्यानंतर तब्बल ३६ दिवसानंतर पुन्हा नागपूरात परतल्यानंतर राणा दाम्पत्याने येथील शनीच्या मंदिरात जावून पुजा-अर्जा केली.

तसेच हनुमान चालिसाचे पठणही केले. त्यानंतर नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की,उध्दव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? हा शनी लवकरात लवकर राज्यातून गेला पाहिजे अशी वाचाळ टीका केली.

वाचा

३६ दिवसांनंतर जेव्हा आम्ही नागपूरमध्ये येतोय, मंदिरात दर्शन करण्यासाठी जात आहोत, तेव्हा इथे एवढी सेक्युरिटी ठेवली आहे. आम्हाला आतमध्ये थांबवून ठेवण्यात आले होते. देवाचा एवढा विरोध महाराष्ट्रात का आहे? उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? हा शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे यासाठी मी दररोज हनुमान चालीसा आणि आरती करेन असेही त्या म्हणाल्या.

ही सगळी नेहमीची प्रक्रिया आहे. आम्ही जिथे जिथे पोहोचतो, तिथे मुख्यमंत्री पूर्ण ताकद लावतात. आम्हाला परवानगी नाकारणे, ताब्यात घेणे असे प्रकार सुरू आहेत. हा सगळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अहंकार आहे. राज्याची जनता हे पाहात आहे. हनुमानाचं नाव घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जातंय. मुख्यमंत्र्यांमध्ये आलेला हा अहंकार मोडून काढण्याचं काम राज्यातील हनुमान भक्त आणि राम भक्त करतील असे आमदार रवी राणा म्हणाले.

नागपूरमध्ये राणा दाम्पत्य मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आता जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी राज्य सरकारवर आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचं संकट दूर व्हावं यासाठी सगळ्यांनी आराधना करायला हवी. महाराष्ट्राला लागलेला शनी लवकरात लवकर दूर व्हायला हवा असेही त्या म्हणाल्या.

वाचा

हनुमान चालीसा पठण हा सगळा दिखावा करत असल्याची टीका होत असल्याबाबत विचारणा केली असता नवनीत राणा यांनी त्यावरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आम्ही दिखाव्यासाठी करतो, मुख्यमंत्री दिखाव्यासाठीही करत नाहीत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी एकदा दिखाव्यासाठी का होईना, हनुमान चालीसा वाचावी असे आव्हानही त्यांनी दिले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *