Breaking News

एकनाथ शिंदे बंड; ३ ऱ्या अंकाचा शेवट उध्दव ठाकरे यांच्या पद आणि आमदारकीच्या राजीनाम्याने त्यांना त्यांचा आनंद पेढे खाऊन घेवू द्या कोणीही आडवे येणार नाही

राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयाचा धक्कादायक निकालानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमदारकी आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार आज कोसळले.

ज्या शिवसैनिकांनी त्यांच्या विजयाचा गुलाल उधळला त्याच शिवसैनिकांच्या रक्ताने मुंबईचे रस्ते रंगविणार होतात का असा सवाल करत सूरतहून गुवाहाटीला जाण्यापेक्षा समोरासमोर बसून बोलला असतात तर हे ही दिलं असते असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत मी आज माझ्या मुख्यमंत्री पदाचा आणि विधान परिषदेच्या आमदारकीचा त्याग करत असल्याचे जाहिर करत आता मी पूर्णवेळ शिवसेनेचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहिर केले.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिक आणि राज्यातील जनतेशी संवाद साधला. तसेच त्यांनी अनिल परब यांच्या हस्ते राजभवनावर आपल्या राजीनाम्याचे पत्रही उध्दव ठाकरे यांनी पठवून दिले.

तुमच्या सत्ता स्थापनेसाठी शिवसैनिकांना स्थानबध्द करत केद्राच्या नोटीसा आल्या. चीनच्या सीमेवरील सुरक्षा कदाचीत मुंबईत आल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. इतकं नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये जाऊ नये असे आवाहन करत नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. त्यामुळे मी सांगतो तुमच्यामध्ये कोणी येणार नाही. किती आमदार आहे हे पाहण्याऐवजी लोकशाहीत डोकी मोजण्यासाठी होतो माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला ते लाजिरवाणे आहे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडणार असेल तर ते पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही. असे सांगत मी काही पुन्हा येईन अशी घोषणा केली नव्हती असा उपरोधिक टोला लगावत मला तिकडे जायचे नव्हते पण मी गेलो अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली.

आम्ही हपालेले होऊन जात नाही मुंबई आणि हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात विठ्ठलाची पूजा उध्दव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. पण महाराष्ट्रात दंगल झाली नाही मुस्लिमानांनी पण ऐकले. मी आलोच होतो अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. माझी शिवसेना माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले.  पवारसाहेब, सोनियाजींच्या सहकार्याना धन्यवाद शासकीस कर्मचाऱ्यांनाही सहकार्यांबद्दल आभार त्यांनी यावेळी मानले.

मी आश्वस्त केले होते जे सुरु केलय ते सुरु राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने झाली. सरकार म्हणून अनेक कामे केली. मात्र सर्वप्रथम रायगड किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण केलेले सहकार्य विसरणार नाही. मला समाधान आहे की, आयुष्य सार्थकी लागले औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव हे नामकरण आज केले. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा देण्यासाठी वांद्रे येथील शासकिय वसाहतीतील भूखंडही दिला. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागते त्याप्रमाणे दृष्ट लागली. या सगळ्या घडामोडीत चारच शिवसेनेची मंत्री आज होते आणि कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होते ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन केले असा टोलाही त्यांनी बंडखोरांना लगावला.

अनेकांना शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळं दिले. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु असल्याचे सांगत न्याय देवतेने निकाल दिलाय. फ्लोअर टेस्ट करण्याचा जो निर्णय दिला. तो मान्यच करावा लागेल. पण राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले. पण १२ विधानपरिषद आमदारांची यादीवर आताही निर्णय घ्यावाचा त्यांना वाटत नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लगावला.

मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ते सुरतला गुवाहटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवय. त्यांच्याशी वाद नकोय असेही त्यांनी यावेळी जाहिर केले.

Check Also

शरद पवार यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे लबाडाघरचं आवताण…

सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. १० वर्षांत स्वतः काही केले नाही, आणि हिशेब आम्हाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *