Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘शपथनामा’ जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले असून, यात अनेक घटकांतील लोकांना केंद्रस्थानी हा शपथनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रचार गीत देखील रिलीज करण्याात आलं आहे.

या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार वंदनाताई चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष मेहमबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या कार्यक्रमाला उपस्थित होते.

जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आम्ही मर्यादित जागा लढवत आहोत विविध प्रश्नांसंबधी आम्ही मांडणी केली आहे, त्याबाबत आमचे लोकं संसदेत आवाज उठवतील अशी ग्वाहीही यावेळी दिली.

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत आहेत. महिला आणि मुली, शेतकरी, कामगार, दिव्यांग, तृतीयपंथी, नागरी विकास, आरोग्य, पर्यावरण हे घटक डोळ्यासमोर ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. पर्यटन, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे घेण्यात आले आहेत असे वंदनाताई चव्हाण म्हणाल्या.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शपथनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये महिला, तरुण, तसेच कामगार यांच्यासह जतनिहाय जनगणना, शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव, राष्ट्रीय सुरक्षा, उपक्षीत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, उद्योग, कर प्रणाली, नागरी विकास, पर्यावरण, पर्यटन, कला, सांस्कृतिक यांसह शाळांचा सेफ्टी ऑडिट यांच्यासह अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, मागील दहा वर्षात शेती संबधीचे प्रश्न वाढले आहेत. हा कालखंड अमित शाह यांच्या पक्षाकडे होता. या कालावधीत त्यांनी काय केलं ते सांगावे. अमित शाह यांचे शेती संबधीच ज्ञान मर्यादीत, त्यावर जास्त काय बोलायचे? त्यांनी दहा वर्षात काय केले ते सांगावं. वीस वर्ष आधी काय झाले, चाळीस वर्ष आधी काय झाले हे विचारु नये असेही सांगितले.

जयंत पाटील म्हणाले की, विदर्भात गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यावर अमित शाहंकडे काय उत्तर आहे? शरद पवार साहेब कृषीमंत्री असताना आत्महत्या पाहून मनमोहन सिंगांना विदर्भात आणून कर्जमाफी करायला सांगितली होती. अजित पवार गटाने मागणी केली त्याचा आनंद आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे..

* डिग्री डिप्लोमा झाल्यानंतर पहिल्या वर्षी नोकरी मिळेपर्यंत ८,००० हजार रुपये स्टायपेन्ड देणार

* स्त्री शिक्षणातले अडथळे दूर करणार

* महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करणार

* महिलांना तातडीने आरक्षण देण्याची मागणी करणार

* शेतकऱ्यांना किमान आधारभूत दर

* केंद्राचा हस्तक्षेप न करता एक आयोग निर्माण करणार

* नवीन पद्धती तंत्रज्ञान याला जास्त बळकटी देणार

* आम्ही ५०० रुपयांपर्यंत गॅस सिलेंडर देऊ

* पेट्रोल डिझेल वरील कर पुनर्निमानीत करू

* शासकीय नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण देऊ

* सरकारी यंत्रणेत कंत्राटी भरती कायमची बंद करू

* ५०% च्या वरील आरक्षणाचा कायदा दूर करू

* इंदिरा सहानी प्रकरणातील ५०% ची अट दूर करू

* खाजगीकरणावर मर्यादा आणू

* अग्नीवीर योजना रद्द करणार

* चीनकडून सीमेवर घुसखोरी चालूये त्यावर आमचे खासदार आवाज उठवणार

* लोकांचा निवडणुकीवर विश्वास बसला पाहिजे

* न्याययंत्रणा वेगवान करण्यासाठी बजेट देऊ

* सरकारी नोकऱ्या रिक्त जागा भरण्याचं काम करू

* ८५०० रुपये स्टायपेंड पहिल्या वर्षी दर महिन्याला देऊ

* स्पर्धा परीक्षांचं शुल्क माफ केलं जाईल

* महिला व मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करू

* शाळा महाविद्यालयात सेफ्टी ऑडीट केलं जाईल

* शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार त्यात केंद्राचा राजकीय हस्तक्षेप कमी करू

* शासकीय क्षेत्रात कंत्राटी भरती बंद करू

* जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करू यानंतर आरक्षणातील ५० टक्क्यांची अट दूर करण्याचं काम करू

* खासगी शैक्षणिक संस्थात महिलांना आरक्षण देणार

* रेशनकार्ड पात्रतेच्या निकषात सुधारणा करणार

* ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय पातळीवर आयोग सुरू करू

* आरोग्यासाठी २०२८-२९ पर्यंत तरतूद ४ टक्क्यांपर्यंत वाढवू तसेच राज्यातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार.

* स्वतंत्र जीएसटी समिती स्थापन करणार.

* शैक्षणिक आणि शेतीविषयक वस्तूंवर जीएसटी आकारणार नाही.

* कामगारांचं किमान वेतन प्रतिदिन ४०० रुपये असेल यासाठी प्रयत्न करू

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *