Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या न्याय पत्र या जाहिरनाम्यावरून सातत्याने टीका आणि आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस पक्षाच्या ‘न्याय पत्र’ विरोधात केलेल्या प्रचार भाषणांवर एक खुले पत्र लिहिले आहे.

२५ एप्रिल रोजी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी X वर (पूर्वीचे ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) पोस्ट केलेल्या पत्रात, मल्लिकार्जून खर्गे पंतप्रधानांना म्हणाले की, काँग्रेस न्याय पत्राचा उद्देश ‘युवक, महिला, शेतकरी, मजूर आणि उपेक्षित लोकांना न्याय प्रदान करणे आहे. ‘. न्याय पत्र त्यांना समजावून सांगण्यासाठी आपण नरेंद्र मोदींना भेटण्यास इच्छुक असल्याचे सांगत पंतप्रधानांना त्यांच्या सल्लागारांकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचा टोलाही यावेळी लगावला.

६ एप्रिल रोजी अजमेर येथील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आणि याला खोट्याचे बंडल म्हटले, जेथे प्रत्येक पान “भारताचे तुकडे तुकडे” करत आहे. काँग्रेसला मुस्लिम लीगचे विचार भारतावर लादायचे आहेत, असा आरोप केला. “स्वातंत्र्याच्या वेळी मुस्लीम लीगमध्ये होती तशीच विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येते,” असा आरोप केला.

सामाजिक न्याय आणि कथित संपत्ती पुनर्वितरणावरील काँग्रेसच्या आश्वासना विरुद्धच्या त्यांच्या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना, नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमधील एका सभेत दावा केला की काँग्रेसचे “अंतस्थ हेतू” एक एक करून समोर येत आहेत. काँग्रेसची समाज कल्याणाची आणि असमानता कमी करण्याची योजना संपत्तीचे पुनर्वितरण आणि “लोकांचे हक्क आणि मालमत्ता हिसकावून घेण्याचा “धोकादायक खेळ” असल्याची टीका केली होती.

अलिगढमधील एका सभेत नरेंद्र मोदींनी असेही ठामपणे सांगितले की, काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांचे सोने आणि ‘मंगळसूत्र’ आणि लोकांच्या खाजगी घरांना खरेदी करेल. “काँग्रेसचे “शहजादा” (राजपुत्र) म्हणतात की त्यांचे सरकार आले तर ते तपासणार की कोण किती कमावते आणि किती मालमत्ता आहे. एवढेच नाही तर सरकार मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचे पुनर्वितरण करेल. त्यांचा निवडणूक जाहीरनामा हेच सांगतो,’ असा दावा नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर करत राहुल गांधींवरही टीका केली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हणाले की, ‘निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भाजपाचे नेते अशा पद्धतीने बोलू लागतील, अशी अपेक्षा होती. भाजपा हे ‘सूट-बूट की सरकार’ (श्रीमंतांचे सरकार) असल्याने, काँग्रेस जेव्हा जेव्हा श्रीमंत आणि गरीब याबद्दल बोलत असते तेव्हा नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लिम असे समीकरण करतात.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच गरिबांना सशक्त करण्याचे काम केले आहे, तर भाजपाने गरिबांची कमाई आणि संपत्ती हिसकावून घेतली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी संदर्भाबाहेर काढलेल्या काही शब्दांचा वापर करून देशात जातीय फूट निर्माण केल्याचा आरोपही केला.

पंतप्रधानांच्या ‘मंगळसूत्र’ टिप्पणीचा संदर्भ देत, खुल्या पत्रात मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, भाजपाने ‘गरीब आणि मागासलेल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारापासून वारंवार पाठ फिरवली आहे’. “मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार, दलित मुलींवरील अत्याचार, बलात्काऱ्यांना हार घालणे याला तुमचे सरकार जबाबदार नाही का? तुमच्या सरकारच्या कारकिर्दीत शेतकरी आत्महत्या करत असताना तुम्ही त्यांच्या बायका-मुलांचे संरक्षण कसे करत आहात, असा सवालही यावेळी केला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *