Breaking News

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार

जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात भारतीय हवाई दलाचे पाच सदस्य जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरनकोट येथील सनई गावात हा हल्ला झाला.

या हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या तुकड्या या भागात रवाना झाल्या आहेत. या घटनेत सामील असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि पोलीस कारवाई करत होते, असे भारतीय वायुसेनेने सांगितले.

स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या भागात हा हल्ला झाला तेथे भारतीय हवाई दलाचे गरुड स्पेशल फोर्स तैनात करण्यात आले आहे.

“जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात, शाहसीतारजवळ IAF वाहनांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला. सध्या स्थानिक लष्करी तुकड्यांकडून परिसरात घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे. काफिला सुरक्षित करण्यात आला आहे, आणि पुढील तपास सुरू आहे.” भारतीय हवाई दलाने ट्विट केले.

जखमी जवानांना विमानाने उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Check Also

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *