Breaking News

चोकलिंगम यांची माहिती, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १५० कंपनी तैनात

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १०,६५२ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत ९५,५४,६६७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) २१,५२७ तर कंट्रोल युनिट (सीयु) १३,९६३ आणि १४,७५५ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून ९७ उमेदवार निवडणूक लढविणार असून निर्धोक प्रक्रिया पार पडावी यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत एस चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना एस चोक्कलिंगम म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण ९७ उमेदवार लढत आहेत. या निवडणूकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन यावेळी केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा

८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे एकूण ९,४१६ मतदार तर १२डी या अर्जाद्वारे ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग असे एकूण ६,६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. गडचिरोली-चिमुर (अज) या लोकसभा मतदार संघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव एका विधानसभा मतदारसंघात अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

मतदानाच्या ४८ तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी पाचही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये ४८ तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

राज्यातील पहिल्या टप्प्यातील ५ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. या पाच लोकसभा मतदार संघातील निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत ११ एप्रिलपर्यंत ४३,८९३ शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून ७२३ शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत ७०,९६७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यामध्ये १ मार्च ते ११ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ३९.१० कोटी एकूण रोख रक्कम तर २७.१८ कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू ६३.८२ कोटी रुपये, ड्रग्ज २१२.८२ कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत ७८.०२ कोटी रुपये अशा एकूण ४२१.४१ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१८७२२ तक्रारी निकाली

१६ मार्च ते १३ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या २३३७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील २३३१ (९९.६३%) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील १९०१८ तक्रारीपैकी १८७२२ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे ५४ प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने ५४ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय तयारीची माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

मतदान केंद्रे

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या

बॅलेट युनिट (बीयु)

कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1

09 – रामटेक

2405

28

5904

3283

3372

2

10- नागपूर

2105

26

5165

2874

2951

3

11- भंडारा-गोंदीया

2133

18

5518

2866

3097

4

12- गडचिरोली-चिमूर

1891

10

2330

2330

2517

5

13-चंद्रपूर

2118

15

2610

2610

2818

एकूण

10,652

97

21,527

13,963

14,755

 मतदारांची संख्या खालीलप्रमाणे- वयोगटानुसार मतदार संख्या

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

ETPBS द्वारे मतदान करणारे सेवा मतदार

85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12अर्जांची संख्या.

1

9- रामटेक

10,44,891

10,04,142

52

20,49,085

1867

1070

2

10 – नागपुर

11,13,182

11,09,876

223

22,23,281

1001

1385

3

11- भंडारा-गोंदिया

9,09,570

9,17,604

14

18,27,188

3211

1465

4

12-गडचिरोली -चिमुर

8,14,763

8,02,434

10

16,17,207

1483

1438

5

13-चंद्रपुर

9,45,736

8,92,122

48

18,37,906

1854

1272

एकूण

48,28,142

47,26,178

347

95,54,667

9,416

6,630

 

 

मतदार संघाचे नाव

18-19

20-29

30-39

40-49

50-79

80 +

1

9- रामटेक

31,725

3,83,276

4,90,339

4,76,971

6,20,361

46,413

2

10 – नागपुर

29,910

3,37,961

5,06,372

5,07,640

7,70,700

70,698

3

11- भंडारा-गोंदिया

31,353

3,66,570

3,99,115

3,98,749

5,93,132

38,269

4

12-गडचिरोली -चिमुर

24,026

3,28,735

3,56,921

3,48,585

5,25,381

33,559

5

13-चंद्रपुर

24,443

3,42,787

4,25,829

4,20,965

5,86,402

37,480

एकूण

1,41,457

 17,59,329

21,78,576

 21,52,910

30,95,976

2,26,419

 

 

 

मतदारांचा तुलनात्मक तपशील :-

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

2014 मधील मतदार संख्या

2019 मधील मतदार संख्या

2024 मधील मतदार संख्या

1

9- रामटेक

16,77,266

19,22,764

20,49,085

2

10 – नागपुर

19,00,784

21,61,096

22,23,281

3

11- भंडारा-गोंदिया

16,55,852

18,11,556

18,27,188

4

12-गडचिरोली -चिमुर

14,68,437

15,81,366

16,17,207

5

13-चंद्रपुर

17,53,690

19,10,188

18,37,906

पहिल्या टप्प्यातील Observer (निरिक्षक):-

क्रमांक व मतदारसंघ

General Observer

Police Observer

Expenditure Observer 

09 – रामटेक

1

1

2

10- नागपूर

1

1

11- भंडारा-गोंदीया

1

1

1

12- गडचिरोली-चिमूर

1

1

13-चंद्रपूर

1

1

1

एकूण

5

3

6

 

दुसऱ्या टप्प्यातील 05 बुलढाणा, 06 अकोला, 07 अमरावती, 08 वर्धा, 14 यवतमाळवाशिम, 15 हिंगोली, 16 नांदेड, 17 परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील 02, पश्चिम महाराष्ट्रातील 07 व कोकणातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये ७ मे २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

  तिसऱ्या टप्प्यात १५-०४-२०२४ पर्यंत रायगड –08 , बारामती – 05, धाराशीव (उस्मानाबाद) – 03, लातूर –01, सोलापुर – 03, माढा –02, सांगली –03, सातारा – 03, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 01, कोल्हापुर –06, हातकणंगले –10  इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल २०२४ अशी आहे.

   तिसऱ्या टप्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील ११ एप्रिल २०२४ पर्यंत अद्यावत मतदारांच्या संख्येचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

मतदान केंद्रे

1

32-रायगड

8,20,025

8,47,220

4

16,67,249

2185

2

35-बारामती

12,38,600

11,27,679

116

23,66,395

2516

3

40-धाराशीव (उस्मानाबाद)

10,51,461

9,39,949

81

19,91,491

2139

4

41-लातूर

10,34,358

9,40,611

61

19,75,030

2125

5

42-सोलापुर

10,40,089

9,87,115

199

20,27,403

1968

6

43-माढा

10,34,999

9,55,035

69

19,90,103

2030

7

44-सांगली

9,52,005

9,13,843

112

18,65,960

1830

8

45-सातारा

9,58,431

9,30,098

76

18,88,605

2315

9

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

7,13,690

7,35,311

12

14,49,013

1942

10

47-कोल्हापुर

9,83,371

9,50,197

91

19,33,659

2156

11

48-हातकणंगले

9,24,878

8,87,274

95

18,12,247

1830

एकूण

1,07,51,907

1,02,14,332

916

2,09,67,155

23,036

        तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

2014 मधील मतदार संख्या

2019 मधील मतदार संख्या

2024 मधील मतदार संख्या

1

32-रायगड

15,32,781

16,52,965

16,67,249

2

35-बारामती

18,13,553

21,14,663

23,66,395

3

40-धाराशीव(उस्मानाबाद)

17,59,186

18,89,740

19,91,491

4

41-लातूर

16,86,957

18,86,657

19,75,030

5

42-सोलापुर

17,02,739

18,51,654

20,27,403

6

43-माढा

17,27,322

19,09,574

19,90,103

7

44-सांगली

16,49,107

18,09,109

18,65,960

8

45-सातारा

17,19,998

18,48,489

18,88,605

9

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

13,67,362

14,55,577

14,49,013

10

47-कोल्हापुर

17,58,293

18,80,496

19,33,659

11

48-हातकणंगले

16,30,604

17,76,555

18,12,247

 

वयोगटानुसार मतदार संख्या :-

अ.क्र

मतदार संघाचे नाव

18-19

20-29

30-39

40-49

50-59

60-69

70-79

80 +

1

32-रायगड

19,564

2,95,690

3,48,303

3,35,888

2,81,510

2,02,553

1,20,837

62,904

2

35-बारामती

29,774

4,29,270

5,72,452

5,09,486

3,69,188

2,41,593

1,40,168

74,464

3

40-धाराशीव (उस्मानाबाद)

39,695

4,01,530

4,31,239

3,91,588

3,17,572

2,05,724

1,30,056

74,087

4

41-लातूर

36,862

4,05,298

4,54,498

4,20,326

2,99,545

1,86,622

1,04,595

67,284

5

42-सोलापुर

32,680

3,98,876

4,64,302

4,20,367

3,30,036

2,10,664

1,16,140

54,338

6

43-माढा

35,005

3,88,673

4,19,234

4,02,264

3,35,536

2,20,702

1,24,933

63,756

7

44-सांगली

31,107

3,51,041

3,88,291

3,74,133

3,22,448

2,12,235

1,25,028

61,677

8

45-सातारा

36,419

3,27,199

3,96,003

4,00,510

3,24,336

2,20,607

1,26,838

56,693

9

46-रत्नागिरी -सिंधुदुर्ग

16,289

2,38,495

2,70,453

3,04,855

2,68,328

1,82,718

1,12,274

55,601

10

47-कोल्हापुर

28,265

3,52,763

3,90,758

3,97,548

3,40,427

2,28,267

1,38,538

57,093

11

48-हातकणंगले

26,090

3,34,672

3,80,756

3,71,971

3,24,152

2,09,192

1,17,152

48,262

          एकूण

3,31,750

 39,23,507

 45,16,289

 43,28,936

35,13,078

23,20,877

13,56,559

6,76,159

 

तिसऱ्या टप्प्यातील Observer (निरिक्षक):-

क्रमांक व मतदारसंघ

General Observer

Police Observer

Expenditure Observer 

32-रायगड

1

1

1

35-बारामती

1

1

40-धाराशीव(उस्मानाबाद)

1

1

1

41-लातूर

1

1

42-सोलापुर

1

1

1

43-माढा

1

1

44-सांगली

1

1

1

45-सातारा

1

1

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

1

1

1

47-कोल्हापुर

1

1

1

48-हातकणंगले

1

1

एकूण

11

6

11

तिसऱ्या टप्प्यातील Electronically Transmitted Postal Ballet System (ETPBS) द्वारे मतदान करण्यास पात्र मतदारांची माहिती :-

अ.     क्र.

क्रमांक व मतदारसंघ

मतदारांची संख्या

1

32-रायगड

1350

2

35-बारामती

2212

3

40-धाराशीव(उस्मानाबाद)

3740

4

41-लातूर

3363

5

42-सोलापुर

1800

6

43-माढा

4840

7

44-सांगली

5997

8

45-सातारा

9573

9

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

1032

10

47-कोल्हापुर

6321

11

48-हातकणंगले

4119

 

एकुण

44,347

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *