Breaking News

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

राज्य निवडणुक अधिकारी यांनी लिहिलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, नितीन गडकरी यांनी प्रचार मोहिमेमध्ये धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपाचा हा प्रकार अनैतिक असून धार्मिक मतदारांचे ध्रुवीकरण करणारा आहे. भाजपाने या पोस्टर्सचा वापर काँग्रेस पक्षाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठीही केला गेला आहे. भाजपा व नितीन गडकरी यांनी केलेला प्रकार आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणुक आयागाने तात्काळ त्यांची उमेदवारी रद्द करणे आणि भाजपावर योग्य दंड ठोठावण्यासह त्वरित कारवाई करावी.

भारतीय जनता पक्षाचे सर्व नियम धुडकावत असताना निवडणुक आयोग सत्ताधारी भाजपावर कसलीच कारवाई करत नाही. सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या बाहुल्या झाल्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरची तपासणी केली, पण भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यास घाबरते यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून निवडणुक आयोग दूर पळत असून केवळ विरोधकांसाठीच आचार संहितेचे नियम आहेत का, असा संतप्त सवालही लोंढे यांनी विचारला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *