Breaking News

Tag Archives: atul londhe

अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेवर कारवाईची धमक महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही का?

कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे, हातपाय तोडू, डोळे काढू, अशी भाषा करतो, चिथावणीखोर भाषण देतो, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे, पोलीस आपले काहीच वाकडं करु शकत …

Read More »

काँग्रेसची खोचक टीका, सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले

कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व त्यांचे सरकार स्थापन केले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाचा पराभव केला व काँग्रेसला बहुतमताने निवडून दिले. महाराष्ट्रातील सरकार ही जनतेने निवडून दिलेले नसून ED, CBI चे सरकार आहे असा घणाघात करत आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट सरकारचा …

Read More »

अतुल लोंढे यांचा खोचक सल्ला, भाजपाने बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आंदोलन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कागदी ओबीसी आहेत, जन्माने नाहीत या खासदार राहुल गांधी यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्षाने जो गोंधळ घातला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा गुजरातच्या वर्तमान पत्रांमध्ये ‘उच्चजातीचा’ व्यक्ती मुख्यमंत्री झाला, अशा पानभर जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर मोदींनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, निर्मला सीतारामण यांचा अर्थसंकल्प नव्हे तर ‘राष्ट्रीय जुमला संकल्प’

मोदी सरकारने मागील १० वर्षात केवळ मोठ-मोठ्या घोषणा व वल्गना केल्या आहेत, त्या प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत म्हणूनच त्याला जुमलेबाजी म्हणतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना शेवटची जुमलेबाजी करण्याची आज संधी मिळाली, आता पुन्हा अशी संधी मिळणार नाही कारण जनता भाजपाला सत्तेत येऊ देणार नाही. निर्मला सीतारामण यांनी आज सादर केलेला …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल,… निधी देण्यासाठी पैसा काय सरकारच्या बापाचा आहे का?

भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही, विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले आहेत. मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात करणे व विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही न देणे …

Read More »

अलका लांबा यांचा आरोप, ‘बेटी बचाओ,…’चा नारा देणारे भाजपाच्या राज्यातच अत्याचारी मोकाट

स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवला आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्याचा काँग्रेस पक्षाचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी केंद्रातील भाजपा …

Read More »

अतुल लोंढे यांचा टोला, … ते महाराष्ट्र काय चालवणार?

भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महाराष्ट्राची अधोगती होत आहे. भाजपा सरकारच्या नाकाखालून मोठे उद्योग राज्याबाहेर जात आहेत, शेतकऱ्यांकडे लक्ष दिले जात नाही, पेपर फुटत आहेत, बेरोजगारी प्रचंड असून नोकर भरती केली जात नाही, १०० पैकी ८८ लोक नोकरी शोधत आहेत. सरकार चालवण्यास भारतीय जनता पक्ष सक्षम नाही. गिरगाव चौपाटीवरच्या लोकमान्य टिळक …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल,… योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे तरी योगदान काय?

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पर्ण झालेले नसतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यांनीही अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले आहे परंतु भाजपाचे लोक शंकराचार्यांवरच तोंडसुख घेऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यात एक …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, … चुका मान्य करता, मग गुन्हा दाखल का केला नाही?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत पास होण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार नुकताच उघड केला. अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीतही चुका झाल्याचे स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे तरीही अद्याप संबंधित दोषींवर गुन्हा दाखल केलेला नाही. इंजिनिअरिंग व फार्मसीसारख्या विभागात असा सावळा गोंधळ होत असेल तर कोणतीही कंपनी महाराष्ट्रातील …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, अब्दुल सत्तार मंत्री आहे की गुंड?

पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांचा आणखी एक मस्तवालपणा महाराष्ट्राच्या जनतेला पहायला मिळाला. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यांना आवरण्यासाठी या मंत्री महाशयांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचेच आदेश दिले. धक्कादायक म्हणजे “या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडे मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त …

Read More »