Breaking News

Tag Archives: atul londhe

अतुल लोंढे यांचा आरोप, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग…

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागलेला नाही असे असताना बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करुन मा. न्यायालयाचा अवमान केला आहे, हा …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, राज ठाकरेंशी युती करून भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार ?

भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणा-या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल …

Read More »

जयराम रमेश यांचा हल्लाबोल इलेक्टोरल बाँड हप्तावसुलीचाच प्रकार… ‘चंदा दो, धंदा लो’

इलेक्टोरल बाँड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून ६ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ज्या कंपन्यांवर ईडी, आयकर, सीबीआयची कारवाई झाली त्या कंपन्यांनी कारवायानंतर इलेक्टोरल बँड घेतले आहेत त्याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला हे स्पष्ट आहे. तसेच ज्या कंपन्यांना मोठ्या कामाची कंत्राटे मिळाली त्या …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, … हा भाजपाचा ‘चुनावी जुमला’

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची चाहूल लागल्याने भारतीय जनता पक्ष एक एक जुमले फेकत आहे. महिला दिनाचे औचित्य साधत गॅस सिलिंडर १०० रुपयाने कमी केला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत ४५० रुपयांनी गॅस सिलिंडर देण्याचे होर्डींग लावले पण सत्ता येऊनही अद्याप ४५० रुपयांचे सिलिंडर काही आले नाही. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळीही दोन सिलिंडर …

Read More »

अतुल लोंढे यांचे आव्हान, ॲड. असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदेंनी खुलासा करावा

महाविकास आघाडीचे सरकार कट कारस्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड असिम सरोदे यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून हा प्रकार करणारे आमदार कोण? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेवर कारवाईची धमक महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही का?

कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे, हातपाय तोडू, डोळे काढू, अशी भाषा करतो, चिथावणीखोर भाषण देतो, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे, पोलीस आपले काहीच वाकडं करु शकत …

Read More »

काँग्रेसची खोचक टीका, सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले

कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व त्यांचे सरकार स्थापन केले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाचा पराभव केला व काँग्रेसला बहुतमताने निवडून दिले. महाराष्ट्रातील सरकार ही जनतेने निवडून दिलेले नसून ED, CBI चे सरकार आहे असा घणाघात करत आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट सरकारचा …

Read More »

अतुल लोंढे यांचा खोचक सल्ला, भाजपाने बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आंदोलन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कागदी ओबीसी आहेत, जन्माने नाहीत या खासदार राहुल गांधी यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्षाने जो गोंधळ घातला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा गुजरातच्या वर्तमान पत्रांमध्ये ‘उच्चजातीचा’ व्यक्ती मुख्यमंत्री झाला, अशा पानभर जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर मोदींनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, निर्मला सीतारामण यांचा अर्थसंकल्प नव्हे तर ‘राष्ट्रीय जुमला संकल्प’

मोदी सरकारने मागील १० वर्षात केवळ मोठ-मोठ्या घोषणा व वल्गना केल्या आहेत, त्या प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत म्हणूनच त्याला जुमलेबाजी म्हणतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना शेवटची जुमलेबाजी करण्याची आज संधी मिळाली, आता पुन्हा अशी संधी मिळणार नाही कारण जनता भाजपाला सत्तेत येऊ देणार नाही. निर्मला सीतारामण यांनी आज सादर केलेला …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल,… निधी देण्यासाठी पैसा काय सरकारच्या बापाचा आहे का?

भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही, विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले आहेत. मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात करणे व विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही न देणे …

Read More »