Breaking News

Tag Archives: atul londhe

अतुल लोंढे यांचा आरोप, सरकारची कंत्राटी नोकर भरती ही सुशिक्षीत तरुणांचे शोषण करणारी कंत्राटी नोकर भरती थांबवा अन्यथा तरुणांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु

देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत. सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवून कुशल व अकुशल नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग करत आहे. अशा पद्धतीची नोकर भरती ही सुशिक्षित तरुणांचे शोषण करणारी आहे, सरकारने …

Read More »

८५ टक्के बहुजनांना ५० टक्के आणि १५ टक्क्यांना ५० टक्के आरक्षण हा कुठला न्याय ? इतर राज्यात ५० टक्यांची मर्यादा हटवली मग मराठा आरक्षणासाठीच अडचण का ? - अतुल लोंढे

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची अपेक्षा आहे, सत्ताधारी पक्षही तीच भाषा बोलतो पण कृती मात्र काहीच करत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सध्या असलेली ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा काढावी लागेल, बिहार, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर काही राज्यात आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे …

Read More »

काँग्रेसचा आरोप, पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव ४५० रुपयांचा सिलेंडर ११५० रुपये करुन २०० रुपये कमी करणे ही मोदी सरकारची लुटारु वृत्ती

महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव …

Read More »

अतुल लोंढे यांचा टोला, अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळेल शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विधानावरून राजकीय चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्या विधानाचा सरळसरळ अर्थ असा लावला जाऊ शकतो की महाराष्ट्राला व देशाला अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळू शकतो, असा टोला प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, परिक्षा पुन्हा घ्या, महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या गरिब मुलांच्या स्वप्नावर पाणी फेरणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी

महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावे म्हणून शासनाने सुरु केल्या आहेत. पण महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परिक्षेत गडबड घोटाळा झाला आहे. या परिक्षेतील भ्रष्टाचार मोडून काढून परिक्षा पुन्हा घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा …

Read More »

अतुल लोंढे यांचे स्पष्ट मत,… शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी मोदी जे काही करत आहेत ते टिळकांच्या विचारसणी विरोधात आहे हे पवारांनी मोदींना सांगावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही हा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या …

Read More »

अतुल लोंढे यांचा टोला, देश कसा चालवायचा हे दीपक केसरकरांनी काँग्रेसला शिकवू नये केसरकरजी, कर्नाटकात ५५ दिवसांनंतरही विरोधी पक्षनेता नाही

काँग्रेसला विरोधी पक्षनेता निवडता येत नाही ते देश काय चालवणार? हे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे विधान बालिश व अत्यंत हास्यास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही व एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र चालवत येत नाही हे जनतेला समजले आहे. काँग्रेसने ६० वर्षांपेक्षा जास्त केंद्रातील व विविध राज्यात सरकारे चालवली …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक फॉक्सकॉनने माघार घेतल्याने मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरही संशयाचे ढग

वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला. पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. हा प्रकल्प पुण्यात होणार होता, त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती, मविआ सरकारनेही सर्व सवलती …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, ७० हजार कोटींचे आरोप करायचे अनं… काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचा प्रयत्न; कोणीही पक्ष सोडणार नाही

भारतीय जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची भिती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरु असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजपाच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, … संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा राष्ट्रपित्याचा अपमान करणारी ‘गोडसेची औलाद’ सदारवर्तेवर कारवाई कधी करणार ?

मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या …

Read More »