Breaking News

Tag Archives: atul londhe

नितीन गडकरीजी, पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री शिंदेजी हाच का तो विकास? जमिनीची किंमत न देताच आदिवासींना घरातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून जोर जबरदस्ती

काही महिन्यांपूर्वी राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना मराठवाड्यातील एका रस्ते प्रकल्पासाठी स्थानिक पातळीवर शिवसेना कार्यकर्त्ये जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा जाहिर उल्लेख केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी करत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रस्ते विकासाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणत सबका साथ सबका …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, खारघर प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गप्प का ? खारघर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय सरकारी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात १४ लोकांचा मृत्यू हे शिंदे-फडणवीसांच्या निर्लज्ज सरकारचे बळी आहेत. सरकार आजही या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहे. खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे. सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी …

Read More »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट, उष्माघाताने ७ ते ८ जणांचा मृत्यू एमजीएम रूग्णालयात झाला मृत्यू, मृतांमध्ये महिला, लहान मुलं आणि पुरुषांचा समावेश

मागील वर्षीचा २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आज सकाळी खारघर येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बोलावित आणि तब्बल महाराष्ट्रातील सर्वच टोल नाक्यांवर टोलमाफी देत जवळपास लाखो लोकांच्या उपस्थित ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज ( १६ एप्रिल …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, विधवांना गंगा भागिरथी संबोधण्याने महिलांचा सन्मान कसा ? मंगल प्रभात लोढा मंत्री म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक

आधुनिक युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे पण आजही समाजातील काही घटक महिलांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असतात. महिलांचे विश्व ‘चुल आणि मुल’ एवढेच मर्यादित असावे अशा बुरसटलेल्या विचारसरणीच्या मनुवादी भाजपा सरकारने पुन्हा एकदा महिलांचा अपमान केला आहे. विधवांना गं. भा. संबोधण्याचा प्रस्ताव आणण्याच्या हेतूमागे महिलांचा सन्मान नसून …

Read More »

अतुल लोंढे यांचे प्रत्युत्तर, जनतेने नाकारलेल्या देशमुखांना प्रसिद्धीसाठी बडबडीची सवय… आशिष देशमुखांचे मानसिक संतुलन बिघडले; उपचाराची गरज

आशिष देशमुख हे वारंवार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुलजी गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असतात. देशमुखांची वक्तव्ये पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, त्यांना चांगल्या उपचाराची गरज असून ते त्यांनी लवकरात लवकर करुन घ्यावेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आहेत. यासंदर्भात …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, MPSC कडून मराठी विद्यार्थ्यांना मराठी ऐवजी हिंदी की बोर्ड कशासाठी ? MPSC चा पुन्हा सावळा गोंधळ, लिपिक व कर सहायकच्या चाचणीत मनमानी बदल: अतुल लोंढे.

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे की त्यांच्या भवितव्याशी खेळण्यासाठी आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. आयोगाचा कारभार तुघलकी पद्धतीने सुरु असून यात विद्यार्थ्यांचा नाहक छळा होत आहे. लिपिक आणि कर सहायक पदासाठी कौशल्य चाचणी परिक्षा सुरु आधी काही दिवस त्यात बदल करण्याचा उद्योग आयोगाने केला आहे. अचानक …

Read More »

काँग्रेसची टीका, बागेश्वर धामच्या भोंदू बाबाला पाठिंबा देणारा भाजपा मनुवादी धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान

जगतगुरु संत तुकाराम महाराज व वारकरी चळवळ ही महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. थोर साधु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आज संतांचा अपमान करणाऱ्यांच्या कार्यक्रमाला खुलेआम परवानगी दिली जाते. बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

काँग्रेसची मागणी, MPSC ने नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीतील संभ्रम दूर करावा नवा अभ्यासक्रमानुसार २०२५ पासून परिक्षा घेण्याचे प्रसिद्धीपत्र आयोगाने जाहीर करावे

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२३ पासून करण्याऐवजी २०२५ पासून करावी असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. परंतु एमपीएसीने राज्यसेवा परिक्षेसंदर्भात अजूनही या निर्णयाबद्दल स्पष्टपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. दोन दिवसापूर्वी आयोगाने कृषी, वन, अभियांत्रिकी या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने २०२३ पासून होतील असे जाहीर केले …

Read More »

ठाकरे गटाच्या टीकेवर अतुल लोंढे म्हणाले, पटोलेंचा राजीनामा अध्यक्षांच्या सूचनेनुसार मित्रपक्षाच्या निर्णयावर मतमतांतर व्यक्त करणे अयोग्य

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा करा शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळया हत्या करण्यात आली आहे. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा बनाव करण्यात आला परंतु ही हत्या असल्याचे उघड झाले आहे. पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. यासंदर्भात …

Read More »