Breaking News

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत.

२००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्रे होती. तर २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. २०१४ मध्ये एकूण ९१ हजार ३२९ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सध्या ९८ हजार ११४ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सर्वांत जास्त मतदान केंद्र पुण्यात तर सर्वांत कमी मतदान केंद्र सिंधुदुर्गात

सर्वांत जास्त मतदान केंद्रे यावेळी पुण्यात आहेत. याची संख्या ८ हजार ३८२ आहे. यानंतर मुंबई उपनगर येथे ७ हजार ३८० मतदान केंद्रे असणार आहेत. ठाण्यात ६ हजार ५९२, नाशिकमध्ये ४ हजार ८०० आणि नागपूरमध्ये ४ हजार ५१० मतदान केंद्रे असतील. सर्वांत कमी मतदान केंद्रे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. सिंधुदुर्गमध्ये ९१८ आणि गडचिरोलीमध्ये ९५० मतदान केंद्रे असणार आहेत.

३००० पेक्षा जास्त मतदान केंद्रे ७ जिल्हयात

३००० पेक्षा जास्त मतदान केंद्रे ७ जिल्हयात आहेत. अहमदनगरमध्ये ३ हजार ७३४,सोलापूरमध्ये ३ हजार ६१७, जळगावमध्ये ३ हजार ५८२, कोल्हापूरमध्ये ३ हजार ३६८, औरंगाबादमध्ये ३ हजार ०८५, नांदेडमध्ये ३ हजार ०४७ आणि सातारामध्ये ३ हजार ०२५ मतदान केंद्र असतील.

१० जिल्हयांत २००० हून अधिक मतदान केंद्रे

२००० पेक्षा जास्त मतदान केंद्रे १० जिल्हयात आहेत. रायगडमध्ये २ हजार ७१९, अमरावतीमध्ये २ हजार ६७२, यवतमाळमध्ये २ हजार ५३२, मुंबई शहरमध्ये २ हजार ५१७, सांगलीमध्ये २ हजार ४४८, बीडमध्ये २ हजार ३५५, बुलढाण्यामध्ये २ हजार २६६, पालघरमध्ये २ हजार २६३, लातूरमध्ये २ हजार १०२ आणि चंद्रपूरमध्ये २ हजार ०४४ मतदान केंद्र असतील.

२००० पेक्षा कमी मतदान केंद्रे असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे – नंदुरबार १ हजार ४१२, धुळे १ हजार ७०४, अकोला १ हजार ७१९, वाशिम १ हजार ७६, वर्धा १ हजार ३०८, भंडारा १ हजार १५६, गोंदिया १ हजार २८८, हिंगोली १ हजार १७, परभणी १ हजार ५८७, जालना १ हजार ७१९, उस्मानाबाद १ हजार ५०३, रत्नागिरी १ हजार ७१७ मतदान केंद्रे असतील.

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *